आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

119 औषधांच्या कमाल किमती निश्चित:कर्करोग, मधुमेहासह अनेक औषधे 40 टक्क्यांपर्यंत स्वस्त

पवनकुमार | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतील (एनएलइएम) ११९ औषधांची कमाल किंमत बुधवारी निश्चित केली. त्यानुसार कर्करोग, मधुमेह, ताप, कावीळसह अनेक गंभीर आजारांवरील औषधांची किंमत ४० % पर्यंत कमी करण्यात आली आहे. कर्करोगावरील औषधे सर्वाधिक म्हणजे ४० टक्के स्वस्त मिळतील. येत्या काळात एनएलइएममध्ये समाविष्ट आणखी काही औषधांच्या किमती कमी केल्या जातील. नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायझिंग अथॉरिटीच्या बैठकीत या यादीतील ११९ प्रकारच्या औषधांची कमाल किंमत प्रति गोळी-कॅप्सूलनुसार निश्चित करण्यात आली. एनपीपीएने ज्या औषधांच्या किमती कमी केल्या. त्यामध्ये तापावरील पॅरासिटामोल, रक्तातील युरिक अॅसिड कमी करणारी औषधे, काही प्रतिजैविकांचा समावेश आहे.

तापावरील पॅरासिटामोल गोळीची किंमत १२% कमी
औषध जुनी किंमत नवी किंमत स्वस्त
टॅमोजोलोमाइड ६६२.२४ ३९३.६ ४०%
एलोप्यूरिनॉल ८.३१ ५.०२ ३९%
सोफोस्बुविर ७४१.१२ ४६८.३२ ३७%
लेट्रोजोले ३९.०३ २६.१५ ३७%
क्लॅरिथोरोमायसिन ५४.८ ३४.६१ ३६%
हेपेरिन २४.३९ १८.९२ २४%
फ्लुकोनाजोल ३४.६९ २६.५३ २३%
मेटफार्मिन ४.०० ३.११ २२%
सेफिक्सिम २४.५ १९.७१ १९%
पॅरासिटामोल २.०४ १.७८ १२%
हायड्रोक्सिक्लोरोक्वीन १३.२६ १२.३१ ७%
{जुनी आणि नवी किंमत प्रति गोळी रुपयात.

बातम्या आणखी आहेत...