आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Many Of IIM's 5,000 Students Have Not Seen The Dream Campus, With Only One Session Left

कोविड इफेक्ट:आयआयएमच्या 5 हजार विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी पाहिले नाही ड्रीम कॅम्पस, फक्त एक सत्र शिल्लक

जयपूर / दीपक आनंदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे कॅट

प्रतिष्ठित आयआयएममध्ये पदवी अभ्यासक्रमाची अर्ध्यापेक्षा जास्त सत्रे ऑनलाइन पूर्ण झाली. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने संस्था लवकर उघडणे अवघड आहे. जानेवारी २०२२ पासून ऑफलाइन सेमिस्टर झाल्यास शक्यतो एका सत्राचे ऑफलाइन शिक्षण करून २०२० च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांना पदवी मिळेलही. यामुळे जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक ‘कॅट’ उत्तीर्ण करून आयआयएम जाणाऱ्या सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचे ड्रीम कॅम्पस बघण्याचे स्वप्न पूर्ण हाेणार नाही. कॅट २०१९ चा निकाल जानेवारी २०२० मध्ये लागला व २० मार्चला लॉकडाऊन लागला. जून-जुलै २०२० पासून आयआयएममध्ये ऑनलाइन वर्ग सुरू झाले. तेव्हापासून कॅम्पस बंद आहे. कोझिकाेड आयआयएमचे संचालक प्रा. देबाशिष चॅटर्जी यांनी सांगितले, या सत्रातील आधीचे महिने गमावलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पसची मजा देण्यासाठी ब्लेंडेट लर्निंग मोड स्वीकारण्यात आले आहे.

आयआयएमच्या एका जागेसाठी ४० विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा
२०२० मध्ये आयआयएमच्या ५१०० जागांसाठी दोन लाख विद्यार्थी आले होते. प्रत्येक जागेसाठी ४० विद्यार्थ्यांत स्पर्धा झाली. आयआयटीच्या एका जागेवर २३ विद्यार्थ्यांत स्पर्धा असते. जेईई मेनद्वारे अॅडव्हान्स्डमध्ये ११ हजार जागांसाठी २.५० लाख विद्यार्थी पात्र ठरतात.

आयआयटी विरुद्ध आयआयएम
जेईई अॅडव्हान्स्ड व कॅट कठीण परीक्षा आहेत. बीटेक पदवी चार वर्षे व एमबीए दोन वर्षात होते. आयआयएम व आयआयटीचे सत्र साधारणपणे जुलैपासून सुरू होते. यामुळे आयआयटी विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये शिकण्यासाठी जास्त वेळ मिळेल तर आयआयएम विद्यार्थ्यांना कमी.

कोरोनाचा शिक्षणावर परिणाम झाला आहे. आम्ही विद्यार्थ्यांना हायब्रीड वर्गातून कॅम्पसचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला. -प्रो. हिमांशू राॅय, संचालक, आयआयएम इंदूर

ज्या विद्यार्थ्यांना कॅम्पस यायचे आहे, त्यांना बोलावणार. सर्व विद्यार्थ्यांना कॅम्पसला यायची संधी मिळेल.-प्रो. जनत शहा, डायरेक्टर, आयआयएम उदयपूर

बातम्या आणखी आहेत...