आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुशिष्य परंपरा जपणारा शिवसेना जगात एकमेव पक्ष:​​​​​​​अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, पण ज्यांनी-ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली अशी आठवण शिवसेनेविरोधात गुर्र-गुर्र करणाऱ्यांना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.

शिवसैनिक म्हणजे केवळ कार्यकर्ता नाही तर गुरुशिष्य नाते जपणारा पक्ष आहे. जगात गुरुशिष्य परंपरा जपणारा शिवसेना एकमेव पक्ष असल्याचेही असेही ते म्हणाले. शिवसैनिक आनंद दिघे यांच्यावर आधारीत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती रिलीज झाला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांचा वक्तशिरपणा करारीचा होता, त्यांनी शिवसैनिक घडवले त्यांच्यासारखेच आनंद दिघे यांनीही शिवसैनिक घडवले. त्यांच्यावर चित्रपट काढणे आणि हे कार्य पुढे नेणे कौतुकास्पद असल्याचेही ठाकरे म्हणाले.

आनंद दिघे निष्ठेने कार्य करीत राहीले त्यांची निष्ठा काय आहे हे सिनेमाद्वारे कळेल.दिघेंनी अनेकांना जपले असेही ठाकरे म्हणाले.

आनंद दिघेंवरील ट्रेलर आवडला - सलमान खान

यावेळी उपस्थित प्रसिद्ध अभिनेता सलमान खान म्हणाला की, आनंद दिघेंवरील ट्रेल मला आवडला असे सांगत आनंद दिघे आणि माझ्यात एक गोष्टीचे साम्य आहे ते एका बेडरुममध्ये राहत होते मीही एकाच बेडरुममध्ये राहतो असेही तो म्हणाला, यानंतर त्याने चित्रपटाचे कौतुकही केले.

यावेळी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या चित्रपटाला साऊथचे सुपरस्टार राजा मौली, अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या. आनंद दिघे यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन सामान्य अडलेल्यांना मदत केली. आनंद दिघेंची भूमिका अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारली असे ते म्हणाले, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित हे सर्व लोक आहेत याचे श्रेय दिघे यांच्या कार्याला जाते असेही शिंदे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...