आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Maratha Reservation Live : Maratha Reservation Final Hearing In Supreme Court Today, Latest News And Updates On Maratha Reservation Verdict

अंतिम सुनावणी:मराठा आरक्षणावर आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, दोन्ही पक्षांच्या वकिलांना युक्तिवादसाठी दीड-दीड दिवस

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सुनावणीत वैद्यकीय प्रवेश आणि मराठा आरक्षणाची मूळ याचिका हेच सर्वात महत्वाचे मुद्दे

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात तीन दिवस अंतिम सुनावणी आजपासून सुरू होत आहे. यामध्ये दोन्ही पक्षांच्या वकिलांना युक्तीवाद मांडण्यासाठी प्रत्येकी दीड-दीड दिवस देण्यात आला आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात 15 जुलै रोजी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली होती. परंतु, त्यामध्ये कुठलाही अंतरिम आदेश नाही दिल्याने मराठा समाजाला दिलासा मिळाला होता. आता हा दिलासा कायम राहणार की नवीन काही आदेश येणार यावरच सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या सुनावणीत वैद्यकीय प्रवेश आणि मराठा आरक्षणाची मूळ याचिका हे दोन मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे, मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाची याचिका होती तेव्हा सुनावणीसाठी 40 दिवस होते. मात्र, मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून केवळ तीन दिवस देण्यात आले. यावर वकिलांनी आधीच आपला आक्षेप नोंदवला. ही सुनावणी राज्यातील एका मोठ्या समाजघटाकाशी संबंधित असल्याने न्यायालयाने वाढीव वेळ द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, सुनावणी आणि युक्तिवादसाठी पाच महिने दिले तर न्याय मिळाला असे होत नाही असे म्हणताना सुप्रीम कोर्टाने वकिलांचा हा युक्तिवाद फेटाळून लावला होता. एवढेच नव्हे, तर सुप्रीम कोर्टाने आपले म्हणणे पटवून देताना अवघ्या दीड तासांत उरकलेल्या ब्रिटनच्या ब्रेक्झिट प्रकरणाची सुद्धा आठवण करून दिली.

महाराष्ट्रात सद्यस्थितीला 74% आरक्षण आहे. यात अनुसूचित जाती -13%, अनुसूचित जमाती – 7%, इतर मागासवर्गीय – 19%, विशेष मागासवर्गीय – 2%, विमुक्त जाती- 3%, NT – 2.5%, NT धनगर – 3.5%, VJNT – 2%, मराठा – 12% आणि आर्थिकदृष्ट्या मागास – 10% असा वाटा आहे.

मराठा आरक्षण क्रोनोलॉजी

 • 30 नोव्हेंबर 2018 – विधानसभेत मराठा आरक्षणाला मंजुरी
 • 27 जून 2019 – मुंबई हायकोर्टाची आरक्षणावर मोहोर
 • 12 जुलै 2019 – आरक्षणाची घटनात्मक वैधता तपासू : सुप्रीम कोर्ट
 • 19 नोव्हेंबर 2019 – 22 जाने 2020 पासून सुनावणी करु : सुप्रीम कोर्ट
 • 5 फेब्रुवारी 2020 – हायकोर्टाच्या निर्णयास स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार
 • 17 मार्च 2020 – सुप्रीम कोर्ट म्हणाले 7 जुलैपासून सुनावणी करु
 • 10 जून 2020 – मुख्य याचिकेसोबतच मेडिकल-डेंटलच्या याचिकांवर निकाल
 • 7 जुलै 2020 – व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी, न्यायालय नियमित सुरु झाल्यावर निकाल देण्याची सुप्रीम कोर्टाची भूमिका
 • 15 जुलै 2020 – तूर्तास अंतरिम आदेश नाही, 27 जुलैपासून नियमित सुनावणी, 27,28,29 जुलैला सुनावणीची तारीख निश्चित