आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | 100 Kg Shivling Found At The Bottom Of Triveni Confluence Beneshwar Dham In Rajasthan

बांसवाडा:राजस्थानात बेणेश्वर धामच्या 70 फूट खाली त्रिवेणी संगमाच्या तळाशी आढळले 100 किलोचे शिवलिंग

बांसवाडा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बांसवाडात ‘भास्कर’च्या पुढाकाराने एसडीआरएफचे इतिहास संशोधन

राजस्थानच्या वागड भागात ३०० वर्षे जुन्या बेणेश्वर धामावर सोम, माही व जाखम नद्यांचा संगम आहे. संगमावर आबुदर्रा हा एक घाट आहे. विष्णूच्या वामन अवताराचे पहिले पाऊल येथेच पडले होते, अशी मान्यता आहे. आबुदर्राच्या खाली संत मावजी महाराजांचे निजधाम आहे. दैनिक भास्करने या लोकमान्यतांचे सत्य जाणून घेण्यासाठी एसडीआरएफच्या पाणबुड्यांच्या मदतीने नदीच्या तळाची छायाचित्रे टिपली.

प्रथमच वागडमध्ये श्रद्धेचे केंद्र संत मावजीसारखी मूर्ती आढळली... आजवर फक्त भित्तिचित्रेच सापडली होती
पाणबुड्यांना पाण्याच्या तळात एक मूर्ती सापडली आहे. ती सकृतदर्शनी संत मावजी महाराजांसारखी दिसत आहे. डुंगरपूर जिल्ह्यातील साबला गावात दालम ऋषींच्या घरी जन्मलेल्या मावजी महाराजांना वागडमध्ये श्रद्धेचे मोठे स्थान मानले जाते. लोककथांत त्यांना कृष्णाचे रूप मानले जाते. आजवर त्यांची कुठेच एकही प्रतिमा आढळलेली नाही. फक्त भित्तिचित्रांतच त्यांची छबी दिसलेली आहे. बेणेश्वर धाममध्ये मावजी महाराजांचे भित्तिचित्र व त्रिवेणीच्या तळात सापडलेल्या मूर्तीत साम्य दिसत आहे. भित्तिचित्रातील मिशा, कुंडल, माला व बाजूबंद ही गोष्टी मूर्तीतही दिसून येत आहेत.

पुरातत्त्व खात्याने सर्व्हे केला तर सत्य जगासमोर येण्याची आशा
पाणबुडे रमेशचंद्र म्हणाले, मी जेव्हा शिवलिंगाला स्पर्श केला असता ते धातूनिर्मित असल्याचे वाटते. पाण्यात अनेक खंडित मूर्ती व दगडी अवशेष आहेत. काही मूर्ती तर १००-१५० किलाेपर्यंत जड असू शकतात. तळात निद्रावस्थेतील जगदंबा देवीची खूप मोठी मूर्ती आहे. तथापि या मूर्ती किती प्राचीन आहे व त्या येथे कशा आल्या याचे सत्य तपासातूनच समाेर येईल. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने येथे तपासणी केली तर इतिहासाचा हा वारसा जपता येईल.

बातम्या आणखी आहेत...