आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Attack |Jammu Kashmir Srinagar | Terror Attack On Police Bus Updates Terror Attack This Evening In Kashmir On Police Bus, 3 Police Personnel Have Died

अतिरेक्यांचा गोळीबार:श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर अतिरेक्यांचा अंदाधुंद गोळीबार; 2 पोलिस शहीद तर 12 जखमी

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे अतिरेक्यांनी हल्ला झाला आहे. त्या हल्ल्यात पोलिसांना लक्ष करण्यात आले होते. अतिरेक्यांनी पोलिसांच्या बसवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला आहे. त्यात दोन पोलिस कर्मचारी शहिद झाले आहेत, तर 12 जण जखमी आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, श्रीनगरच्या जे-वन खोनमोह रोडहून भारतीय रिझर्व पोलिसांची (IRP)9वी बटालियन गाडी जात असताना, अतिरेक्यांनी त्या बसवर गोळीबार करत हल्ला केला. त्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, 12 पोलिस कर्मचारी जखमी आहेत. या सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.

पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचे हत्यार नव्हते

अतिरेक्यांनी ज्यावेळी बसवर हल्ला केला, तेव्हा पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचे हत्यार नव्हते, विशष म्हणजे केंद्रबिंदू असणारी बसदेखील बुलेटप्रूफ नसल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडे शील्ड आणि लाकडी दांडे होते. अतिरेक्यांनी बसला थांबवण्यासाठी बसच्या टायरावर गोळीबार केला, त्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला.

हल्ल्यात बसमध्ये असलेले पोलिस कर्मचारी

1. एएसआय गुलाम हसन

2. कॉन्स्टेबल सज्जाद अहमद

3. कॉन्स्टेबल रमीज अहमद

4. कॉन्स्टेबल बिशम्भर दास

5. सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल संजय कुमार

6. सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल विकास शर्मा

7. कॉन्स्टेबल अब्दुल मजीद

8. कॉन्स्टेबल मुदस्सिर अहमद

9. कॉन्स्टेबल रविकांत

10. कॉन्स्टेबल शौकत अली

11. कॉन्स्टेबल अरशीद मोहम्मद

12. कॉन्स्टेबल शफीक अली

13. कॉन्स्टेबल सतवीर शर्मा

14. कॉन्स्टेबल आदिल अली

श्रीनगरमध्ये पोलिसांवर गोळीबार झाल्यानंतर बसमध्ये सर्वत्र रक्त साचले होते.
श्रीनगरमध्ये पोलिसांवर गोळीबार झाल्यानंतर बसमध्ये सर्वत्र रक्त साचले होते.
दहशतवाद्यांनी प्रथम गोळी झाडून बसचे टायर पंक्चर केले.
दहशतवाद्यांनी प्रथम गोळी झाडून बसचे टायर पंक्चर केले.
बस थांबताच दहशतवाद्यांनी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू केला.
बस थांबताच दहशतवाद्यांनी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू केला.
गोळी झाडल्यानंतर खिडकीजवळ बसलेल्या पोलिसाचे रक्त.
गोळी झाडल्यानंतर खिडकीजवळ बसलेल्या पोलिसाचे रक्त.
दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळी तैनात सुरक्षा दलाचे जवान. सर्च ऑपरेशन सुरू आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळी तैनात सुरक्षा दलाचे जवान. सर्च ऑपरेशन सुरू आहे.

सर्च ऑपरेशन सुरू
या हल्ल्यानंतर पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने अतिरेक्यांनी पलायन केले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. अतिरेकी पंथचौक परिसरातच लपून बसलेले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...