आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | CDS General Bipin Rawat Death | Latest Update | Bipin Rawat | CDS General Bipin Rawat Death ,The Funeral Will Be Held At Kantam In Delhi On Friday

राष्ट्रीय शॉक:सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनाने शोक; दिल्लीत शुक्रवारी कँटमध्ये होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रावत, मधुलिका आणि अपघातात प्राण गमावलेल्या सर्वांचे मृतदेह मद्रास रेजिमेंट सेंटरमध्ये आणण्यात आले आहेत.

येथून गुरुवारी संध्याकाळी रावत आणि मधुलिका यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात येणार आहे. अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली. अपघातातील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रावत यांचे अंतिम दर्शन शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान घेता येणार आहे. यानंतर कामराज मार्ग ते बेरार चौकापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. दिल्ली कँटोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे, त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शहा आणि वित्तीय मंत्री निर्मला सीतारमण यांचा समावेश आहे.
  • हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले त्या घटनास्थळी फॉरेंसिक सायन्स डिपार्टमेंटची एक टीम रवाना झाली आहे. त्याचे नेतृत्व डायरेक्टर श्रीनिवासन हे करत आहे. घटनास्थळावरून फ्लाइट डेटा रिकॉर्डर, कॉकपिट व्हाइस रिकॉर्डर मिळाले आहे.
  • हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी फॉरेंसिकची टीम गेली असून, तेथे एक काळा रंगाचा बॉक्स आढळला असून, त्यातून ही घटना कशी घडली त्याचे कारण सापडू शकेल.

हेलिकॉप्टरमधील हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुणसिंह गंभीर जखमी आहेत. बुधवारी दुपारी 12.22 वाजता झालेल्या या अपघातानंतर जखमींना वेलिंग्टन बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. संध्याकाळी हवाई दलाने जनरल रावत व त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. सीडीएस होण्यापूर्वी लष्कर प्रमुखपद भूषवलेले जनरल बिपिन रावत यांच्या पश्चात दोन मुली आहेत.

हेलिकॉप्टर अपघातातील मृतांत जनरल रावत व त्यांच्या पत्नीसह ब्रिगेडियर एल.एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरुसेवकसिंह, नायक जितेंद्रकुमार, लान्सनायक विवेककुमार, लान्सनायक बी.साई तेजा, हवालदार सतपाल, विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान (पायलट), स्क्वॉड्रन लीडर के. सिंह (को-पायलट), ज्युनियर वॉरंट ऑफिसर दास व ज्युनियर वॉरंट ऑफिसर ए.प्रदीप यांचा समावेश आहे. हेलिकॉप्टरमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे डायरेक्टिंग स्टाफ ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांची प्रकृती गंभीर आहे.

संरक्षण दलांच्या सर्वोच्च अधिकारीपदी असताना अशा दुर्घटनेत मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. हवाई दलाने तपास सुरू केला आहे. अपघाताचे वृत्त आले तेव्हा केंद्रीय कॅबिनेटची बैठक सुरू होती. संरक्षणमंत्री राजनाथसिंह बैठकीतून थेट जनरल रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. बुधवारी सायंकाळी सुरक्षा प्रकरणांच्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत सदस्यांनी जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहिली. जनरल रावत व त्यांच्या पत्नीचे पार्थिव गुरुवारी दिल्लीत आणले जाईल. शुक्रवारी दिल्लीतील कँटमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. सरकार गुरुवारी प्रकरणावर संसदेत निवेदन करणार आहे.

जनरल रावत यांनी सीडीएस म्हणून 1 जानेवारी 2020 ला पदभार स्वीकारला होता. 1 जानेवारी 2022 ला त्यांना या पदावर 2 वर्षे पूर्ण होणार होती. ते बुधवारी दिल्लीहून सकाळी 8.47 वाजता विशेष विमानाने कोईंबतूरला आले. येथून ते वेलिंग्टनच्या डिफेन्स स्टाफ कॉलेजमध्ये लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणेंसोबत एका कार्यक्रमात सहभागी होणार होते.

सुलूर एअरफोर्स स्टेशनहून ते एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टरमधून वेलिंग्टनसाठी रवाना झाले. सकृतदर्शनी मानले जात आहे की, दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. यामुळे हेलिकॉप्टर कोसळले अन् त्याने पेट घेतला. घटनास्थळी दाखल झालेले तामिळनाडूचे वनमंत्री के. रामचंद्रन म्हणाले, अपघात इतका भीषण होता की, मृतदेह पार जळून गेलेले होते. जिल्हाधिकारी एस.पी अमृथ यांच्यानुसार, डीएनए तपासणीनंतरच 13 जणांच्या मृतदेहांची ओळख पटू शकेल. घटनेनंतर सर्वात आधी स्थानिक लोकांनी पेटलेल्या हेलिकॉप्टरमधून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळेनंतर लष्कराची बचाव मोहिम सुरू झाली.

बातम्या आणखी आहेत...