आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत व त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह १४ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर तमिळनाडूतील निलगिरीच्या डोंगराळ भागात धडकून कोसळले. देशाच्या तिन्ही सैन्यांच्या सर्वोच्च पदावर तैनात राहिलेले बिपिन रावत यांचा जन्म उत्तराखंडमधील पौडीमध्ये १६ मार्च १९५८ रोजी झाला होता.
जनरल रावत यांच्यापूर्वी त्यांच्या दोन पिढ्यांनी लष्करात सेवा दिली. राष्ट्रीय सुरक्षा अकादमी (एनडीए), भारतीय सैन्य अकादमी (आयएमए) मध्ये शिकलेले रावत डिसेंबर १९७८ मध्ये लष्करात सामील झाले होते. ते ११ व्या गोरखा रायफलच्या ५ व्या बटालियनमध्ये सहभागी झाले. कारण त्यांचे वडील लक्ष्मणसिंह याच युनिटमध्ये सहभागी होते. लक्ष्मणसिंह जनरल पदावरून निवृत्त झाले.जनरल राव दोन लष्करी मोहिमांमुळे सदैव स्मरणात राहतील. दोन्ही मोहिमांत त्यांनी निडरपणे निर्णय घेतले. एक मोहिम म्यानमारमध्ये लष्कर घुसवून कारवाईची होती.
दुसरी पाकविरोधात सर्जिकल स्ट्राइक. पाकिस्तानच्या विरोधात बालाकोट स्ट्राइक व पीओकेवर सर्जिकल स्ट्राइक. बालाकोट स्ट्राइकच्या काळात रावत लष्करप्रमुख होते. पीओकेवरील सर्जिकल स्ट्राइकवेळी उपलष्करप्रमुख होते. त्यांच्या निगराणीखाली सर्जिकल स्ट्राइक झाली होती. ते तत्ववादी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या अडल्टरीवर दिलेल्या निवाड्यावररही त्यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला होता. २०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून हटवण्याचा ऐतिहासिक निवाडा केला होता. याबरोबर कलम ३७७ संपुष्टात आणले गेले.
हे कलम अनैसर्गिक लैंगिक संबंधाला गुन्हा ठरवणारे होते. कोर्ट म्हणाले, हे कलम समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारे आहे. त्यावर तत्कालीन लष्करप्रमुख रावत यांनी जानेवारी २०१९ मध्ये निवाड्यावर आक्षेप घेतला होता. लष्कर याबाबतीत रुढीवादी आहे. आम्ही लष्करात अशा पापाची परवानगी देऊ शकत नाहीत. लष्करात ते लागू केले जाऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते.
दुर्घटनेत बचावलेले ग्रुप कॅप्टन वरूण सिंह रुग्णालयात आहेत. २०२० मध्ये तेजसमधील तांत्रिक अडचणीनंतरही सुखरूप विमान उतरवल्याबद्दल त्यांना याच वर्षी शौर्यचक्र प्रदान करण्यात आले होते.
मधुलिका सिंह मूळच्या मध्य प्रदेशातील शहडोल संस्थानच्या वंशज, रावत जानेवारीत सासुरवाडीला येणार होते
इंदूर सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका सिंह मूळच्या मध्य प्रदेशचा आहेत. विंध्य क्षेत्रातील एकेकाळच्या शहडोल संस्थानातील वंशजांपैकी होत्या. सोहागपूर संस्थानचे वारस मृगेंद्रसिंह यांच्या त्या कन्या होत्या. १९८६ मध्ये बिपिन रावत दिल्लीत कॅप्टन असताना मधुलिका यांचा त्यांच्याशी विवाह झाला होता.. रावत दांपत्याला दोन मुली आहेत. कृतिका रावत यांचा विवाह मुंबईत झाला.
धाकट्या तारिणीचे शिक्षण सुरू आहे. मधुलिका यांचे बंधू यशवर्धन सिंह म्हणाले, रावत जानेवारीत सासुरवाडीला येणार होते. विवाहानंतर दीदीचे शहडोलला तसे येणे कमी होते. मधुलिका ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलच्या विद्यार्थिनी राहिल्या आहेत.लष्करप्रमुख झाल्यानंतर मधुलिका तीन वर्षांपूर्वी ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मधुलिका यांचे पुढील शिक्षण लखनऊ व दिल्लीत झाले हाेते. आर्मी वाइव्ह्ज वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षाच्या रूपाने त्या संस्मरणीय राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.