आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Chardham Road Approved By Supreme Court, 3 Road 10 M Instead Of 5.6 M. Will Be Wide

चारधाम : राष्ट्ररक्षणाचा मार्ग:चारधाम रोडला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, 3 रोड 5.6 मीटरऐवजी 10 मी. रुंद होणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने उत्तराखंडमध्ये सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या चारधाम प्रोजेक्टच्या ऑल वेदर रोडच्या रुंदीकरणाचा मार्ग प्रशस्त केला. कोर्टाने मंगळवारी ऑल वेदर रोड ५.५ मीटरएेवजी १० मीटर रुंद करण्याची परवानगी दिली. न्या. डी.वाय. चंद्रचूड, न्या. सूर्यकांत व न्या. विक्रम नाथ यांच्या पीठाने एका एनजीओच्या याचिकेतील आक्षेपांवर केंद्र सरकारला हा दिलासा दिला. आता ऋषिकेश-बद्रीनाथ हायवे, ऋषिकेश-गंगोत्री व टनकपूर-पिथौरागड हायवे दोनपदरी करता येईल.

कोर्ट म्हणाले, देशाच्या संरक्षणार्थ आवश्यक प्रकल्पांचा न्यायालयीन आढावा घेतला जाऊ शकत नाही. नुकतेच सीमेवर सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. सरकारचा निर्णय देशाच्या संरक्षण गरजांनुसार आहे. कोर्टाने संरक्षण मंत्रालयाला म्हटले की, पर्यावरणाच्या संदर्भात उच्चाधिकार समितीच्या सल्ल्यांचे मार्ग रुंदीकरणादरम्यान पालन केले जावे. यासाठी कोर्टाने निवृत्त न्यायमूर्ती ए.के. सिकरी यांच्या अध्यक्षतेखाली ओव्हरसाइट समिती स्थापली आहे. सिटिझन फॉर ग्रीन डून या एनजीओने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले होते की केंद्र कोर्टाच्या ५.५ मी. रुंद रस्ते निर्मितीच्या आदेशाच्या विपरीत अधिक रुंद रस्ता तयार करत आहे.

भास्कर एक्स्पर्ट : चीनला आव्हान देण्यासाठी धोरणात्मक मार्ग हवेत : - लेफ्ट. जनरल संजय कुलकर्णी (लष्करविषयक तज्ज्ञ)
उत्तराखंडकडून भारत-चीन सीमेवरील चौक्यांपर्यंत लष्करच नव्हे, अवजड वाहने व सैनिकांच्या वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा असायला हव्यात. लष्कराच्या गरजेनुसार रस्त्यांसाठी किमान ७ मीटर कॅरीवेज असायला हवे. याला डीएलपीएस स्टँडर्ड म्हणतात. असे रस्त दुहेरी असायला हवेत. जेणेकरून वेळ वाया जायला नको. रणगाडे, ब्रह्मोस क्षेपणास्त्र सीमेच्या दिशेने नेले जात असेल तर दुसरे वाहन तेथून जाऊच शकणार नाही, असे व्हायला नको. तिबेट, चीन-पाक कॉरिडॉर आणि एलएसीच्या दुसऱ्या बाजूला धोरणात्मक रस्त्यांचे जाळे पाहता डीएलपीएस मानक पूर्ण करणाऱ्या रस्त्यांची मागणी वाढली आहे.

भास्कर ग्राउंड रिपोर्ट : सुमारे ७३७ किमी काम पूर्ण, आता महत्त्वाच्या १६३ किमीत काम सुरू होऊ शकेल
मनमीत, डेहराडून
ऑल वेदर रोड प्रकल्पानुसार १२ हजार कोटी गुंतवणुकीसह ९०० किमी रस्ता तयार होणार आहे. यात ऋषिकेशपासून गंगोत्री (२६६ किमी), ऋषिकेश ते बद्रीनाथ (२९२ किमी) आणि कुमाऊंमध्ये टनकपूर ते पिथौरागड तवाघाट (२५५ किमी) मार्गांचा समावेश आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम झालेले आहे. मात्र, २०२०मध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर हे काम थांबले होते. यात ऋषिकेश-गंगोत्री हायवेतील उत्तरकाशी ते गंगोत्री या ९० किमी मार्गाचा समावेश आहे. असाच टनकपूर-तवाघाट या ३० किमी आणि ऋषिकेश-बद्रीनाथ हायवेचे काही काम थांबले हाेते. ऋषिकेश-बद्रीनाथ हायवेवर देवप्रयागजवळ तोताघाटीत पाषाण फोडल्याने रस्ता ब्लॉक होत होता. आता १६३ किमी उर्वरित मार्ग पूर्ण होऊ शकेल.

- धार्मिक-सामरिक महत्त्व : चारधाम रोड पर्यटनासाठीही महत्त्वाचा आहे. प्रकल्पपूर्तीनंतर लोक आपल्या खासगी वाहनांतून चारधामला जाऊ शकतील. पुढील २०० वर्षे अडचण येणार नाही.

- दुपदरी रोडमुळे लष्कराला फायदा : हे तिन्ही रोड सीमेवरील भागांसाठी फीडर रोडप्रमाणे आहेत. दुपदरी मार्ग असल्यामुळे लष्करी वाहतूक सुकर होईल, तसेच सामान्य वाहतूकही चालू शकेल.

- सर्व हंगामांत सीमेपर्यंत जाता येणार : या प्रकल्पामुळे भारतीय लष्कराला चीन सीमेपर्यंत सहज पोहाेचता येईल. कोणत्याही वातावरणात कोणत्याही वेळी लष्कर चीन सीमा गाठू शकेल.

आल्प्स आणि अँडीजमध्ये रस्ते होऊ शकतात, येथे का नाही?
- पर्यावरणवादी आणि पद्मश्री प्रो. अनिल जोशींनुसार, दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वतरांगा असोत किंवा युरोपातील आल्प्स पर्वत, सर्व पर्वतरांगांत चांगले रस्ते होऊ शकतात. नियमात ठेवून त्यांना पर्यावरणपूरक केले जाते. हिमालयातही नियमांनुसार रस्ते झाले तर चांगले महामार्ग होऊ शकतील.

- भूगर्भतज्ज्ञ प्रो. डॉ. एमपीएस विष्ट सांगतात, पर्वतांमध्ये “रोड अँड स्लोप मस्ट बी वन’ तत्त्व लागू होतेे. पठारी भागांत जसे १२ मीटर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला १-१ मीटर अंतर सोडले जाते. पर्वतांमध्ये वरील डोंगर व दरी हा पण रस्त्याचाच भाग मानला जातो. आतापर्यंत ऑल वेदर रोडमध्ये हे नियम लागू नव्हते. आता उर्वरित काम नियमानुसार झाले तर दर्जेदार रस्ते तयार होतील.

बातम्या आणखी आहेत...