आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Coonor Iaf Chopper Crash | Captain Varun Singh Was The Only Survivor Of The Helicopter Crash; Group Captain Varun Singh Family Armed Forces

दुर्घटनेत बचावले:अपघातात बचावलेले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंह लाइफ सपोर्टवर; तिन्ही दलांत कुटुंबातील सदस्य, वडील म्हणाले- माझा मुलगा 'शूर'

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत व त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह 14 अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर तमिळनाडूतील निलगिरीच्या डोंगराळ भागात धडकून कोसळले. या दुर्घटनेत बिपिन रावत यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या अपघातात बचावले आहे.ते सध्या लाइफ सपोर्टवर आहेत.

दुर्घटनेत बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह रुग्णालयात आहेत. 2020 मध्ये तेजसमधील तांत्रिक अडचणी नंतरही सुखरूप विमान उतरवल्याबद्दल त्यांना याच वर्षी शौर्यचक्र प्रदान करण्यात आले आहे. कॅप्टन वरुण सिंह हे लष्करी कुटुंबातील असून, कुन्नूर हेलिकॉप्टर अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. वरुण सिंह हे भारतीय वायुसेनेचे कॅप्टन आहेत. त्यांचे वडील निवृत्त कर्नल केपी सिंह आर्मी एअर डिफेन्सच्या रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. लेफ्टनंट कमांडर तनुज सिंह, कर्नल केपी सिंह यांचा मुलगा आणि ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचा भाऊ, भारतीय नौदलात लेफ्टनंट कमांडर आहेत.

कॅप्टन वरुणचे वडील केपी सिंह भोपाळमध्ये राहतात. दैनिक दिव्य मराठीशी संवाद साधताना ते म्हणाले की, माझा मुलगा शूर आहे आणि त्याला प्रत्येक परिस्थितीत कसे लढायचे हे माहित आहे. लहान मुलगा तनुजच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावण्यासाठी ते मुंबईला गेले होते, त्यावेळी त्यांना अपघाताची माहिती मिळाली.

देवरिया (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असलेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना यंदाच्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. उड्डाण नियंत्रण यंत्रणा खराब झाल्यानंतरही 10 हजार फूट उंचीवरून विमानाचे यशस्वी लँडिंग केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. संकटाच्या वेळी वरुणने संयम गमावला नाही आणि तेजस विमानाचे लोकवस्तीपासून दूर नेत यशस्वी लँडिंग केले होते.

दोन आठवड्यांपूर्वीच कॅप्टन वरुण भोपाळला आले होते

वरुणचे वडील केपी सिंह हे मूळचे लखनौचे आहेत, पण निवृत्त झाल्यानंतर ते भोपाळ येथे स्थायिक झाले आहेत. भोपाळ विमानतळाच्या सनसिटी कॉलनीतील इनरकोर्ट अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर राहतात. सिंह यांचे शेजारी आणि लेफ्टनंट कर्नल ईशान आर यांनी सांगितले की वरुण दोन आठवड्यांपूर्वीच भोपाळला आले होते आणि 10 दिवस कुटुंबासोबत राहिले होते.

शस्त्रक्रियेपूर्वी पत्नीशी बोलायचे

कॅप्टन वरुण सिंह यांना उपचारासाठी वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले आहे. बुधवारी रात्री चेन्नईहून तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून ग्रुप कॅप्टन सिंहचे ऑपरेशन सुरू करण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी नेण्यापूर्वी कॅप्टन शुद्धीत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीशी बोलायचे आहे. असे सांगितले.

चंदिगडमध्ये शिक्षण, नंतर एनडीएमध्ये निवड
वरुण सिंह यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. वरुणने चंडी मंदिर स्कूल, चंदिगडमधून बारावी पूर्ण केली. 2004 मध्ये त्यांची एनडीएमध्ये निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...