आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे लाेकार्पण सोमवारी दुपारी १.३७ ते १.५७ या काळात रेवती नक्षत्रातील शुभ मुहूर्तावर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री काशी विश्वनाथ संकुलात गंगा नदीचे पाणी घेऊन पायी येतील. ते सुमारे ४० मिनिटे संकुल परिसरात असतील. धामाचा विकास, विस्तार आणि सौंदर्यीकरणानंतर ५० हजार चौरस मीटर भाग तयार करण्यासाठी सुमारे ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मंदिराच्या आजूबाजूची दुकाने खरेदी करण्यासाठी ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
बाबा विश्वनाथांची पूजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉरिडॉरचे लोकार्पण करतील. मंदिर चौकात देशातील २०० प्रमुख संत तसेच २०० विद्वान आणि मान्यवरांना ते संबोधित करतील. संध्याकाळी ते क्रूझने गंगाभ्रमण करून घाटांवरील ११ लाख दिव्यांचे अवलोकन करतील. दशाश्वमेध घाटासमोर थांबून ते गंगा आरतीत सहभागी होतील. त्यांच्यासोबत राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह भाजपशासित ११ राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हजर राहतील. लोकार्पण कार्यक्रमानंतर बांधकामात सहभागी झालेल्या २३०० मजुरांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो घेणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.