आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाशीत अद्वितीय, अप्रतिम आणि वास्तुकलेचा अद्भुत नमुना ठरावा असा काशी विश्वनाथ काॅरिडाॅर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. भगवान शिवाच्या नगरीत १२, १३,१४ डिसेंबरला देव दीपावलीसारखे वातावरण असेल. भाविकांना यातून भव्यतेची प्रचिती सहजपणे येऊ शकेल. काॅरिडाॅर भाविकांना मंत्रमुग्ध करतानाच आध्यात्मिक अनुभव देणारा ठरेल. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर राेजी दीपप्रज्वलनाने लाेकार्पण केले जाणार आहे. त्यासाठी व्यापक तयारी सुरू झाली आहे. लाेकार्पणाच्या निमित्ताने बाबा विश्वनाथाच्या आवडीची फुले शेजारच्या अनेक राज्यांतून मागवण्यात आली आहेत. त्यात मदार, गुलाब, झेंडूसह इतर अनेक फुले मागवण्यात आली आहेत. पुष्प सजावटीतून वाराणसीचे साैंदर्य आणखी खुलणार आहे. श्री काशी विश्वनाथ धामच्या लाेकार्पण साेहळ्याला अभूतपूर्व व एेतिहासिक बनवण्यासाठी काशीतील प्रत्येक घरात उत्सवासारखे वातावरण असेल. सर्व घरांत िदवे उजळतील.
या काळात देव दीपावलीसारखे चित्र दिसेल. यासाठी संपूर्ण काशीत तयारी केली जात आहे. सात लाख घरात प्रसाद पोहोचवला जाणार आहे. बीएचयूचे राजकीय विभागाचे अधिष्ठाता प्रोफेसर कौशल किशोर मिश्रा म्हणाले मोदींनी कॉरिडॉर तयार करून सनातन धर्माच्या अनुयायांत आपली प्रतिमा मजबूत केली आहे. सरकार हा प्रकल्प पूर्ण करून निवडणुकीत त्याला मॉडेल म्हणून मांडू शकते. मोदी ८ मार्च २०१९ रोजी श्रीकाशी विश्वनाथ धामच्या भूमिपूजनात सहभागी झाले होते. तेव्हा कॉरिडॉरच्या प्रकल्पासाठी ३३९ कोटी रुपयांच्या खर्चाची योजना तयार करण्यात आली होती. पुढे ही योजना वाढवून ८०० कोटी रुपयांवर पोहोचली. भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे संमेलन१३ डिसेंबर राेजी पंतप्रधान माेदींच्या हस्ते श्री काशी विश्वनाथ धामचे लाेकार्पण हाेईल. कार्यक्रमासाठी संत, विद्वानही काशीत दाखल हाेतील. १४ डिसेंबर राेजी भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे संमेलनदेखील पवित्र नगरीत प्रस्तावित आहे. १७ डिसेंबरला देशभरातील महापाैर काशीत दाखल हाेतील.
५१ हजार ठिकाणी, ११ ज्योतिर्लिंगांवर लोकार्पण कार्यक्रमाचे थेट प्रसारण
१३ डिसेंबर रोजी ७ लाख घरांपर्यंत पुस्तिका तथा प्रसादाचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे देशभरातील १५ हजार ४४४ मंडळांत ५१ हजार ठिकाणी थेट प्रक्षेपित केले जाईल. त्यात प्रत्येक ठिकाणी ५०० ते ७०० लोक कार्यक्रमाशी जोडले जातील. १२ तारखेस १३५ कोटी लोक हा कार्यक्रम पाहू शकतील. इतर ११ ज्योतिर्लिंगांच्या तीर्थस्थळी लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
विश्वनाथाला प्रिय फूल मदार, गुलाबांनी कॉरिडॉरची सजावट
पंतप्रधान नरेंद्र माेदी १३ डिसेंबरला काशी गाठून सर्वात आधी काशीतील बाबा कालभैरवाच्या दरबारात हजेरी लावतील. येथे आशीर्वाद घेऊन ते राजघाटला जातील. तेथून ते बाेटीने ललिता घाटावर जातील. गंगेचे दर्शन घेऊन पवित्र जल घेऊन पायी काॅरिडाॉरच्या मार्गाने श्री काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात जातील. अभिषेक झाल्यानंतर दाेन तासांच्या पूजेत सहभागी हाेतील. नंतर लाेकार्पण करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.