आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथे झालेला हिंसाचार हा सुनियोजीत षडयंत्र असल्याचे एसआयटीने म्हटले आहे. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आता आरोपींवरील कलम वाढण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यासह आणखी 14 जणांना न्यायालयाने बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटी आरोपींवरील कलम वाढण्याची मागणी करत असून, त्यांच्यावर हत्या आणि अपराधिक षडयंत्र रचल्याच्या कारणावरून अधिक कलम लावण्याची मागणी करणार आहे.
केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा आरोपी मुलाला भेटले
आपल्या मुलावर कलम वाढण्याची माहिती मिळताच, केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ धाव घेत, आज दुपारी जेलमध्ये जाऊन मुलगा आरोपी आशिष मिश्रा याची भेट घेतली. अजय मिश्रा यांनी जेलमध्ये आपल्या मुलाचे सांत्वन केले आहे. आरोपी आशिषसह अन्य 14 आरोपींना आज न्यायालय सहज हजर राहणे बंधनकारक होते, मात्र दुपारपर्यंत कोणताही आरोपी न्यायालयात पोहोचलेला नाही.
षडयंत्र रचून हत्या
केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यासह आणखी 14 जणांवर कलम 279,338,304 ए अंतर्गत गुन्हा दाखल आहे. एसआयटीने केलेल्या तपासणीत लखीमपुर हिंसाचार हा जाणून-बुजून केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता आरोपींवर कलम 307,326,302,34,120B,147,148,149,3/25/30 या अधिकच्या कलम लागू करण्याची मागणी एसआयटीने न्यायालयात केली आहे.
सुप्रीम कोर्टात तीनदा झाली सुनावणी
लखीमपुर हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टात आतापर्यंत तीनदा सुनावणी पार पडली आहे. लखीमपुर हिंसाचाराचा तपास एसआयटी करत असून, तपास कार्य मंद गतीने सुरू असल्याने न्यायालयाने एसआयटीला फटकारले होते.
03 ऑक्टोंबर रोजी झाला होता हिंसाचार
लखीमपुरात 3 ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्याविरोधात काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला होता. त्याचदरम्यान एक गाडीने शेतकऱ्यांना चिरडले होते. त्यात चार शेतकऱ्यांसह एका पत्रकाराचा देखील मृत्यू झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला होता. त्या आरोपाखाली आशिष मिश्रा यासह आणखी 14 जणांविरुद्ध हत्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.