आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Modi | Pm Modi | Sitting On The Ladder With The Workers Who Built Kashi Vishwanath Dham, Also Photographed

मोदींनी मानले कारागीरांचे आभार:काशी विश्वनाथ धाम बनवणाऱ्यांचे मोदींनी हात जोडून मानले आभार, 10 मिनिटे केला फुलांचा वर्षाव, सोबत जेवले सुद्धा!

वाराणसीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ धामच्या नवीन संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ललिता घाटावरून गंगाजल घेऊन काशी विश्वनाथ धामवर पोहोचले. त्यांनी मंदिरात मंत्रोच्चाराने पूजा केली आणि बाबांचा गंगाजलाने अभिषेक केला. यावेळी पंतप्रधानांनी धार्मिक नेते आणि मान्यवरांशी संवाद साधला. तसेच त्यांनी कॉरिडॉरचे उद्घाटन केले. त्यानंतर मोदींनी संकुल बनवणाऱ्या 50 पेक्षा जास्त कारागिरांची भेट घेतली. सगळे जण नवीन कॅम्पसच्या पायऱ्यांवर बसले होते.

त्यादरम्यान मोदी तिथे पोहोचले आणि त्यांनी सुमारे दहा मिनीटे त्या कारागिरांवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मोदी देखील त्यांसोबत पायऱ्यांवर बसले. मोदींनी कारागिरांसोबत बऱ्याच वेळ संकुलाच्या कामाविषयी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी विश्वनाथ धाम निर्मितीदरम्यानचे अनुभव विचारले. त्यानंतर मोदींनी त्यांच्यासोबत फोटो काढले. पंतप्रधान मोदींनी आपल्यासोबत काही वेळ घालवत फोटो काढल्याने कारागिर मोठ्या प्रमाणात आनंदी पाहायला मिळत होते. मोदींनी सर्वांसोबत चर्चा केली, तसेच आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद म्हणत त्यांचे आभार मानले.

800 कोटी रुपये खर्चून विश्वनाथ धामचे नूतनीकरण
काशीतील मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट विश्वनाथ धाम 800 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. प्राचीन मंदिराचे मूळ स्वरूप कायम राखत 5 लाख 27 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ विकसित करण्यात आले आहे.

8 मार्च 2019 रोजी झाली होती पायाभरणी
विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 मार्च 2019 रोजी करण्यात आला होता. तेव्हापासून कारागिर बाबा विश्वनाथ मंदिर संकुलाचे निर्माणाचे कार्य करत आहेत. जगात कोरोना महामारी सुरू असताना देखील संकुल निर्मितीचे कार्य सुरू होते.

पंतप्रधान मोदींनी साफसफाई करणाऱ्यांच्या पाय धुतले
24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे झालेल्या कुंभात साफ-सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुतले होते. तेव्हा मोदी म्हणाले होते की, सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळेच या कुंभाला स्वच्छ कुंभाची ओळख मिळाली आहे. दिव्य कुंभाला भव्य कुंभ बनवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान खुप मोठे आहे. कर्मचाऱ्यांनी कुभांत साफ-सफाईसाठी विशेष लक्ष ठेवले. त्यांनी चर्चा संपुर्ण जगात होत आहे. असे मोदी म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...