आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Nawab Malik | I Am Ready To Go To The ED Office, If Kirit Somaiya Has Been Made The Spokesperson By The ED, It Should Be Announced; Reply From Nawab Malik

सोमय्यांना प्रत्युत्तर:मी स्वतः ईडी कार्यालयात जायला तयार, सोमय्यांना प्रवक्ता बनवले असेल तर जाहीर करा; नवाब मलिकांचा सवाल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

'मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे, मात्र सोमय्यांना ईडीने प्रवक्ता बनवले असेल, तर जाहीर करावे' असे म्हणत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले.

शुक्रवारी मलिक यांनी ट्विट करत म्हटले होते की, साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यावरून भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज मलिकांना घेरले. सोमय्यांनी आज नवाब मलिकांवर जोरदार आरोप केले. ते म्हणाले की, मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आला म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्कीच जाणार, यात काही शंका नाही. असा दावा सोमय्यांनी केला.

पुढे सोमय्या म्हणाले की, मलिक आता ट्विटच्या मागे लागले आहे, कारण त्यांना भीती वाटतेय. की, पुण्यात नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केला आहे. ही जमीन नातेवाईकांच्या नावे केली आहे. जमिनी ढापल्या आहेत. त्यामुळेच नवाब मलिक यांना भीती वाटत आहे. आता घोटाळेबाजांची चौकशी होणार आणि चोरीचा माल जप्त होणार. पैसे देऊन, प्रेशर करून घोटाळा लपत नाही. चोरी केली तर शिक्षा होणारच, असा दावाही सोमय्यांनी केला.

मलिकांचे सोमय्यांना प्रत्युत्तर

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपाला नवाब मलिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे. माझ्या घरी धाड पडणार, अशी अनेक दिवसांपासून माहिती आहे. जर सोमय्यांना ईडीने प्रवक्ता बनवले असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे. असे म्हणत मलिकांनी सोमय्यांना टोला लगावला आहे.

पुढे मलिक म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या कुठल्याच बोर्डावर छापेमारी झालेली नाही. फक्त शुक्रवारी एका वक्फ बोर्ड अधिकाऱ्याला बोलावण्यात आले. खोट्या बातम्या पसरवून बदनाम करण्याचे काम थांबवा. वक्फ बोर्डाने कोणत्या केस रजिस्टर केल्या आहेत, त्याची माहिती द्यावी. असे आवाहन मलिकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...