आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयरलँडहून आंध्रप्रदेशला आलेल्या एका 34 वर्षीय विदेशी पर्यटकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. तो आयरलँडहून मुंबईमार्गे 27 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टनम येथे आता होता. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची RT-PCR चाचणी करण्यात आली होती, त्यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्यांची पुन्हा विशाखापट्टनम येथे कोरोना चाचणी करण्यात आली त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याचे अहवाल जीनोम सीक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असता, त्यात त्याला ओमायक्रॉन असल्याचे आढळले आहे. त्यामुळे सध्या विशाखापट्टनम येथे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
तर तिकडे चंडीगढमध्ये एका 20 वर्षीय युवकाला ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. तो 22 नोव्हेंबर रोजी इटलीहून भारतात परतला होता. त्यानंतर त्यांची 01 डिसेंबर रोजी कोरोना चाचणी करण्यात आली असता, त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे या युवकाने फाइजर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. देशात आतापर्यंत 36 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.
देशात गेल्या 24 तासात 81 लाख जणांचे लसीकरण
देशात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर आता लसीकरणास गती मिळताना दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनूसार, देशात गेल्या 24 तासात 81 लाख जणांनी कोरोना लसीचे डोस घेतले आहे. त्यामुळे देशातील लसीकरणाचा आकडा हा 133 कोटी इतका झाला आहे.
शनिवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनूसार, देशात कोरोना लसीकरणाचा आकडा 132 कोटी 84 लाख 04 हजार 705 इतका झाला आहे. शनिवारी 81 लाख 08 हजार 719 जणांनी कोरोना लस घेतली आहे. त्यात 20 लाख 13 हजार 140 जणांना पहिला तर, 60 लाख 95 हजार 579 जणांना कोरोनाचा दुसरा डोस मिळाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.