आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Omicron | Two New Omicron Patients In Delhi, 45 Omicron Patients In India; Maharashtra Has The Highest Number Of 20 Patients

देशाची चिंता वाढली!:दिल्लीत ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण, देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 45 वर; महाराष्ट्रात सर्वाधिक 20 रुग्ण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात ओमायक्रॉनचा फैलाव होताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत दोन नवे ओमायक्रॉन विषाणूने रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता देशाच्या चिंतेत भर पडली आहे. दिल्लीत दोन रुग्ण आढळल्याने देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ही 45 इतकी झाली आहे. मंगळवारी दिल्लीत चार ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले होते, त्यानंतर आज पुन्हा दोन रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या सहा झाली आहे. त्यातील एका जणांने ओमायक्रॉनवर मात केली असून, त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

देशात ओमायक्रॉनचे आता 45 रुग्ण
आज दिल्लीत दोन रुग्ण आढळल्यानंतर आता देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 45 एवढा झाला आहे. सोमवारी राज्यात दोन ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली, ते दुबईला गेले होते. तर गुजरातमध्ये देखील दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 20 बाधित
राज्यात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सोमवारी लातूरमध्ये एक आणि पुण्यात एकाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 20 एवढी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...