आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाचणीत फेल:ओमायक्रॉन वाढला; पण तपासण्या कमी, आरटीपीसीआर घटवणे धोक्याचे

नवी दिल्ली / पवनकुमारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात आरटीपीसीआरचे सरासरी प्रमाण केवळ ६०%...येथे ओमायक्रॉनचे रुग्ण सर्वाधिक

दिल्लीत शनिवारी आणखी एक ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर या व्हेरिएंटने संक्रमित रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. यात सर्वाधिक १७ रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हा व्हेरिएंट इतका संक्रामक आहे की डब्ल्यूएचओपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वच सातत्याने सांगत आहेत की, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची त्वरित ओळख पटवून आरटीपीसीआर टेस्ट करावी आणि पॉझिटिव्ह आढळल्यास जीनोम सिक्वेन्सिंग करावे. हे पाऊल किती महत्त्वाचे आहे, हे समजण्यासाठी फक्त दोनच आकडे पहा.. ज्या ५ राज्यांत आतापर्यंत ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेे, त्यामध्ये महाराष्ट्रातील आरटीपीसीआरचे प्रमाण ६०.६% आहे. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण येथेच आहेत. उर्वरित ४ राज्यांत कुठेच सरासरी एकूण टेस्टमध्ये आरटीपीसीआरचे प्रमाण ८०% पेक्षा कमी नाही. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ९ ओमायक्रॉन राजस्थानात असून येथे सरासरी एकूण चाचण्या ५ राज्यांपैकी सर्वात कमी आहेत.

कर्नाटकात लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त चाचण्या केल्या, आरटीपीसीआरही जास्त, ओमायक्रॉनचे रुग्ण २ पेक्षा जास्त नाहीत ओमायक्रॉनचे रुग्ण असलेल्या ५ राज्यांत कर्नाटकने लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक चाचण्या केल्या. शिवाय आरटीपीसीआरचे प्रमाणही अधिक ठेवले. त्यामुळे २ डिसेंबरला २ रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढलेले नाहीत.

देशात ओमायक्रॉनचा सर्वात पहिला रुग्ण २ डिसेंबरला आढळला होता. त्यानंतर ज्या ५ राज्यांमध्ये हा व्हेरिएंट सापडला त्यात केवळ कर्नाटक आणि महाराष्ट्रातच दररोजच्या चाचण्यांत थोडी वाढ केली. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार चाचण्यांत राजस्थान सर्वात मागे आहे.

बातम्या आणखी आहेत...