आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Parliment Session | Winter Session Parliment Rahul Gandhi, This Is Not The Way To Run Democracy, This Is The Assassination Of Democracy

12 खासदारांचे निलंबन:हा लोकशाही चालवण्याचा मार्ग नसून, ही तर लोकशाहीची हत्या; खासदारांच्या निलंबनाविरोधात राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज पुन्हा 12 खासदारांच्या निलंबनावरून राज्यसभेत गदारोळ पाहायला मिळाला आहे. 12 खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी आज पुन्हा राज्यसभेच्या सभागृहात करण्यात आली, विरोधी पक्षांनी मोठ्य़ा प्रमाणात सभागृहात घोषणाबाजी केल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील 12 खासदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यापार्श्वभुमीवर त्यांनी संसद परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून ते विजय चौकापर्यंत रॅली काढत निषेध केला. राहुल गांधी यांनी निलंबनाचा विरोध करताना काळे वस्त्र परिधान केले होते. राहुल म्हणाले की, "सरकार विरोधी पक्षांना प्रश्न विचारण्य़ाचा हक्क हिसकावून घेत आहे. पंतप्रधान सभागृहात येत नाहीत, हा लोकशाही चालवण्याचा मार्ग नसून, लोकशाहीची हत्या करण्यात येत आहे." असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले, गेल्या दोन आठवड्यांपासून 12 खासदार निलंबित आहेत, त्याचे म्हणणे कोणी ऐकण्यास तयार नाही, निषेध करण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून ते संसद परिसरात धरणे आंदोलन करत आहेत. असे राहुल म्हणाले.

काय आहे प्रकरण
यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. मागच्या सत्रात 11 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदारांनी त्यांच्या हिंसक वर्तनाने आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर जाणीवपूर्वक हल्ले करून सभागृहाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली आहे. त्यामुळे या सर्व खासदारांना सुरू असलेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या भागापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

या खासदारांनाचे निलंबन
प्रियंका चतुर्वेदी आणि डोना सेनसह आणखी 12 खासदारांना आज निलंबित करण्यात आले. त्यात एलाराम करीम (सीपीएम), काँग्रेसच्या फूलो देवी नेताम, छाया वर्मा, आर बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासिर हुसेन, अखिलेश प्रसाद सिंह, सीपीआयचे बिनॉय विश्वम, टीएमसीच्या शांता छेत्री आणि शिवसेनेचे अनिल देसाई यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...