आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि आणखी 13 जवानांचे मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेत हेलिकॉप्टर अपघाताबद्दल माहिती दिली.
राजनाथ सिंह यांनी संसदेत दिलेल्या चार मिनीटांच्या भाषणामध्ये सुरूवातीलाच दुर्घटनेत जीव गेलेल्या जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 जवानांचा श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, जनरल रावत हे डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे पूर्वनियोजित दौऱ्यावर होते. काल सकाळी 11.48 वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. ते दुपारी 12.15 वाजता उतरणार होते, परंतु 12.08 वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरचा एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) शी संपर्क तुटला.
अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे काही स्थानिक नागरिक अपघातास्थळी पोहोचले. तेव्हा मिलिट्री हेलिकॉप्टरला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाची टीम देखील घटनास्थळी पोहोचली. जवानांनी ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले होते तिथे जाऊन, हेलिकॉप्टरमधील अधिकाऱ्यांना रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. रेस्क्यू केल्यानंतर सर्वांना लष्करी रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीचे मृत्यू झाल्याचे कळाले.
या दुर्घटनेत ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंह, नाईक गुरसेवक सिंह, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक बी. साई तेजा, ज्युनियर वॉरंट ऑफिसर दास, ज्युनियर वॉरंट ऑफिसर ए प्रदीप आणि हवालदार सतपाल अशा 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे एकटे या घटनेत बचावले आहे.
पुढे राजनाथ सिंह म्हणाले की, हेलिकॉप्टर दुर्घटनेत वरुण सिंह हे बचावले आहेत. त्यांच्यावर वेलिंग्टन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांना वाचव्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचे शव आज संध्याकाळपर्यंत दिल्लीत आणले जातील. सेनेच्या अधिकाऱ्यांचा अंत्यसंस्कार सन्मानाने केले जाईल. एअर चीफ मार्शल वीआर चौधरी यांनी उद्याच पाठवले जाईल. एअर मार रामेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात चौकशीचे आदेश दिले आहेत. असे राजनाथ सिंह म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.