- Marathi News
- National
- Marathi News | Rajnath Sing | Last Rites Of Lance Naik Sai Teja In Chittoor | Lt Colonel Harjinder Singh In New Delhi
8 PHOTOS अंतिम निरोप:लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह यांच्यासह बी साई तेजा यांच्यावर आज अंत्यसंस्कार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली श्रद्धांजली
नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील बेरार चौकात पोहोचून लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात जीव गेलेल्या काही जवानांचा आज अंत्यसंस्कार करण्यात आला. दिल्लीतील बराक चौकात लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यावेळी देशाचे रक्षा मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांनी लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंहाच्या कुटुंबाचे सांत्वन केले. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील लांस नायक बी साई तेजा आणि पश्चिम बंगालच्या बागडोगरातील हवलदार सतपाल राय यांना देखील राजनाथ सिंह यांनी अंतिम श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात लान्स नाईक बी साई तेजाच्या पार्थिवावर लावलेला तिरंगा त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला.
बी साई तेजाचे पार्थिव त्यांच्या मुळगावी पोहोचले. तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
बी साई तेजावर पूर्ण लष्करी इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लान्स नायक बी साई तेजाला अखेरचा निरोप देताना बंदुकीची सलामी देताना लष्कराचे जवान.
हवालदार सतपाल राय यांचे पार्थिव घेऊन लष्कराचे जवान पश्चिम बंगालमधील बागडोग्रा येथे पोहोचले.
सतपाल राय यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती, त्यानंतर लष्करी सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील जितेंद्र कुमार वर्मा यांचाही हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रविवारी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले.