आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना यूपीएत जाणार का यासंदर्भात 24 तासाची मुदत दिली होती, आणखी 12 तास शिल्लक आहेत. त्यानंतर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेल. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राउत यांनी दिली आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
संजय राउत हे सध्या दिल्लीत असून, त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली असून ते आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहेत. यूपीएमध्ये सामील होण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसकडून 24 तास देण्यात आले आहे. त्यातील 12 तास अजूनही शिल्लक असल्याचे संजय राउत म्हणाले.
पत्रकारांनी त्यांना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, त्यांना इतके गांभीर्याने का घेता, त्यांची विधाने नैराश्यातून येत असतात, तुम्ही देखील त्यांना गांभीर्याने घेत जाऊ नका अन्यथा तुम्हाला त्रास होईल. माझी उत्तर ऐकून त्यांना त्रास होईल, त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. विरोधी पक्षाच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही. असे संजय राउत म्हणाले.
प्रियांका गांधी यांच्यासोबत पहिली राजकीय भेट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आणि माझी भेट नेहमी होत असते. महाराष्ट्राच्या घडामोडीसंदर्भात राहुल गांधी नेहमी माझी भेट घेत असतात. मात्र प्रियंका गांधी यांना मी राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटलो. असल्याचे राउत म्हणाले. त्या काँग्रेसच्या महासचिव आहेत त्यामुळे भेटायला काही हरकत नाही. त्यांनी भेटण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार आज त्यांना भेटणार आहे.
माहिती उद्धव ठाकरेंना देतो
मी पक्षाचा शिवसैनिक आहे, त्यामुळे इकडे बसून जे काय करतो ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशाने करत असतो. घडामोडी ज्या घडतात ज्यात आम्ही सहभागी होत असतो ती उद्धव ठाकरेंना देत असतो, असे संजय राउत म्हणाले. उद्धव ठाकरेंचे काय म्हणने आहे ते सांगतिलचे ना, ते लवकरच तुमच्याशी संवाद साधतील. महाराष्ट्रात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, लहान घटक पक्ष यांच्या साथीने सरकार चालवतो. हा मिनी यूपीएचा प्रयोग हा क्रांतिकारक आहे. देशात याची चर्चा सुरु आहे. अशी प्रतिक्रिया संजय राउत यांनी दिली.
शरद पवार यांच्याशी चर्चा करुन राहुल गांधींना भेटलो
शरद पवार यांच्याशी काल माझी चर्चा झाली. राहुल गांधी यांना भेटण्यापूर्वी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. प्रियांका गांधी या काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आहेत. निर्णय प्रक्रियेत त्या सहभागी असतात. त्यांना आमच्याशी एका विषयावर चर्चा करायची असेल तर आमचे ते कर्तव्य आहे, असे संजय राउत म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना खासदारांचे निलंबन
राज्यसभेचे 12 खासदार जिथे आंदोलन करत आहेत. तिथे आम्ही आज जाणार आहोत. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार उद्या तिथे जातील. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमच्या खासदारांचे निलंबन झाले, असे राउत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.