आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर:खोऱ्यात दगडफेकीचे पुन्हा सावट; आता महिलांना बनवतायत ढाल, पोलिसांच्या चकमकीवर लोकांचे प्रश्नचिन्ह

श्रीनरग / हारुण रशीदएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीर : जनता आणि सरकार यांच्यातील दरी वाढली

काश्मीर खाेऱ्यात दगडफेकीच्या धोकादायक घटना पुन्हा घडत असल्याचे दिसते. तीन आठवड्यांत तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. एक दिवस आधी श्रीनगरच्या रंगरेटमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत नंतर सुरक्षा दलावर स्थानिक लोकांनी प्रचंड दगडफेक केली. त्याचे नेतृत्व स्थानिक महिला करत होत्या. आंदोलकांनी झालेली चकमक बनावट स्वरूपाची होती, असा दावा स्थानिक नागरिकांनी केला. १३ डिसेंबर रोजी रंगरेटमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. परंतु स्थानिक लोकांनी लष्कराच्या याबाबतच्या वक्तव्याला खोटे ठरवले आहे. घटनास्थळाजवळ राहणारी एक महिला म्हणाली, ही खोटी चकमक होती. दोन मुले रस्त्यावरून जात होती. त्याचवेळा पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ते दहशतवादी असतील तर त्यांना अटक करता आली असती.

घटनास्थळाजवळ राहणारी एक अन्य महिला म्हणाली, हे क्षेत्र शांत भागात आहे. या भागात एखादी धुमश्चक्री कधी झाली होती, हे देखील आठवत नाही. पोलिस केवळ घोषणा करते. त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पोलिस काही पुरावा देखील देत नाहीत. म्हणूनच आम्ही न्याय मिळेपर्यंत लढण्याचे ठरवले आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळील खासगी शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजला जप्त केले. परंतु त्यास सार्वजनिक करण्यात आले नाही. दगडफेकीची पहिली घटना २४ नोव्हेंबरला रामबागमध्ये झाली होती. तेव्हा पोलिसांनी तीन दहशतवाद्यांच्या खात्म्याचा दावा केला होता. तीन जणांना एका कारमधून बाहेर काढून गोळी मारण्यात आल्याचा स्थानिक लोकांचा दावा आहे. या तरुणांकडे कोणतीही शस्त्रे नव्हती. दुसरी घटना शोपियांतील चेक चोलन भागात ८ डिसेंबर रोजी चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. चकमकीनंतर अनेक तरूण गोळा झाले आणि त्यांनी सुरक्षा दलावर दगडफेकीस सुरुवात केली.

पोलिसांनी तीन दहशतवाद्यांकडून एके ४७ रायफल, २ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. रामबाग, रंगरेटमधील दगडफेक समजू शकते. परंतु शोपियांमध्ये झालेली दगडफेक धोकादायक प्रवृत्ती दर्शवणारी आहे, असे तज्ञांनी सांगितले. यातून लोकांमध्ये कायद्याचा धाक कमी चालला असे वाटते.

किरकोळ पुराव्याखाली अटक
श्रीनगर विद्यापीठातील एक प्रोफेसर म्हणाले, शेकडो लोकांना किरकोळ पुराव्याच्या आधारे अटक करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत काश्मीरमध्ये महागाई व बेरोजगारी यांचे स्वरूप अतिशय भयंकर आहे. पोलिस व सुरक्षा दलाकडे लोक सरकारचे प्रतिनिधी या भावनेतून बघतात. मानवी हक्क उल्लंघन तसेच इतर मुद्द्यांवर राग व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर दगडफेक करतात.

लोकांच्या शंका दूर करायला हव्या
काश्मीरमध्ये सध्या अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. राज्यात शोध मोहिम राबली जात आहे. रंगरेट व रामबागमध्ये पोलिसांनी चकमकीविषयी स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. १६ नोव्हेंबरला हैदरपोरा मध्ये कथित दोन नागरिकांच्या हत्येनंतर सरकारने १५ दिवसांत तपास पूर्ण करून दोषींना शिक्षा दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात असे काही घडले नाही.

बातम्या आणखी आहेत...