आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Suicide | Bihar Suicide After Five Months Of Marriage, First Wife Also Committed Suicide 3 Years Ago

धक्कादायक:लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यानंतर पती-पत्नीची आत्महत्या; 3 वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीनेही केली होती आत्महत्या

भीलवाडाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एका नवविवाहित जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या भीलवाडा येथे घडली आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. दीपक नागौरी आणि कविता नागौरी असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. दीपक हा किराणा होलसेल व्यापारी होता, त्याचे कविता सोबत दुसरे लग्न झाले होते. दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली.

कविता ही दीपकची दुसरी पत्नी होती, तीन वर्षांपूर्वीच दीपकच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. पहिल्या पत्नीकडून दीपकला दोन मुलं आहेत. शनिवारी आत्महत्या करण्यापूर्वीच त्याने या दोन्ही मुलांना आजी-आजोबांकडे पाठवले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याने पोलिसांनी घराला लॉक करत, रविवारी सकाळी ग्रामस्थ आणि कुंटुबियांच्या आल्यानंतर फाळावरून त्या दोघांचे मृतदेह खाली काढले. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण सध्या अस्पष्ट असून, पोलिस आत्महत्या का केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, दीपक आणि त्याची पत्नी कविता या दोघांचा मृतदेह वेगवेगळ्या खोलीत सापडला आहे. कुटुंबियानी सांगितले की, आत्महत्या करण्यासारखे कोणतेच कारण नव्हते. दीपकचा गावात व्यापार चांगल्या प्रकारे सुरू होता.

बातम्या आणखी आहेत...