आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाता वैष्णोदेवीच्या दारी भाविकांची रीघ लागली आहे. यंदा आतापर्यंत ५१.२२ लाख भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. कटरा येथील मुक्कामी दरराेज २० हजारांवर भाविक पाेहोचू लागले असल्याची माहिती माता वैष्णाेदेवी व्यवस्थापन समितीने दिली. हरियाणा, पंजाब, हिमाचलसह देशभरातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. शेजारील राज्यात असलेले भाविक दर शनिवारी हजेरी लावत आहेत. नवीन वर्षात भाविकांची रीघ आणखी वाढेल, असा अंदाज आहे. काेराेनाबाबत व्यवस्थापन समितीने आवाहनदेखील केले आहे.
मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी काेराेना नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे. काेराेनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जास्त दक्षता बाळगावी लागणार आहे, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे. व्यवस्थापन समितीचे एक वरिष्ठ अधिकारी ‘भास्कर’ ला म्हणाले, काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी अनेक प्रकारची उपाययाेजना करण्यात आली आहे. त्यानुसार संपूर्ण परिसराला सॅनिटाइझ केले जाते. काेराेना नियमांचे काटेकाेरपणे पालन केले जाते. मास्क परिधान करणे व डिस्टन्सिगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी जाहीर माहिती दिली जात आहे. मार्गांवर व्हिडिआे वाॅलवरदेखील या दृष्टीने सादरीकरण केले जात आहे.
निगेटिव्हचा अहवाल आवश्यक, थर्मल स्कॅनिंग
भाविकांसाठी आरटीपीसीआर चाचणी महत्त्वाची असेल. ७२ तासांहून जास्त जुना अहवाल चालणार नाही. भाविकांची थर्मल स्कॅनिंग करून त्यांचे तापमान जाणून घेतले जाते. या महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात निवाऱ्यांतील २०० भाविक पाॅझिटिव्ह आढळून आले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.