आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Vishwanath Dham Is Now So Large That 2 Lakh Devotees Can Come Together

15 फोटोंमध्ये काशीची भव्यता:विश्वनाथ धाम आता एवढे विशाल की 2 लाख भाविक एकत्र येऊ शकतील, बाबांचा दरबार थेट गंगेशी जोडला

वाराणसीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसीतील श्रीकाशी विश्वनाथ धामचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकार्पण करणार आहेत. श्रीकाशी विश्वनाथ धामचा तब्बल २४४ वर्षांनंतर जीर्णोद्धार करण्यात आला आहे. आता भव्य धाम उद्घाटनासाठी सज्ज आहे. शिव आणि त्यांची लाडकी उत्तरवाहिनी गंगा यांना एकमेकांशी जोडणाऱ्या श्रीकाशी विश्वनाथ धामची भव्यता सध्या पाहायला मिळत आहे. धामचा मंदिर चौरस परिसर आता इतका विस्तीर्ण झाला आहे की येथे २ लाख भाविक उभे राहून पूजा करू शकतील.

फोटोंमध्ये पाहा श्रीकाशी विश्वनाथ धामची भव्यता...

आता शिवभक्तांना श्रावण सोमवार, महाशिवरात्री काळात कोणतीही अडचण येणार नाही.

श्रीकाशी विश्वनाथ मंदिराच्या परिक्रमा मार्गात देवतांना गंगा स्नान करून विधिव्रत त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्याचे काम सुरू आहे.

बाबा धाम आता थेट मोक्षदायिनी गंगेशी जोडले गेले आहे. गंगेत स्नान केल्यानंतर शिवभक्तांना थेट बाबांच्या दरबारात हजेरी लावता येणार आहे.

काशीच्या विद्वानांच्या मते, धामचे लोकार्पण ज्या वेळी आणि ज्या पद्धतीने होत आहे, त्या वेळी संपूर्ण जगात राष्ट्राचा मान वाढेल आणि देशवासियांचे कल्याण होईल.

धामची भव्यता सध्या काशीच्या रस्त्यांवरून ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

श्रीकाशी विश्वनाथ धाममध्ये मुमुक्षु भवनही बांधण्यात आले आहे. मोक्षाच्या इच्छेने काशीला येणाऱ्यांना या मुमुक्षु भवनात राहता येईल.

श्रीकाशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनापूर्वी मंदिरातील दोन्ही सुवर्ण शिखरांची स्वच्छता करण्यात आली आहे. दोन्ही सुवर्णशिखरे उजेडात चमकत आहेत.

8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री काशी विश्वनाथ धामची पायाभरणी करण्यात आली होती.

श्रीकाशी विश्वनाथ धाम मंदिराचा चौरस परिसर आता इतका विस्तीर्ण झाला आहे की येथे २ लाख भाविक उभे राहून पूजा करू शकतील.

1835 मध्ये महाराज रणजित सिंह यांनी श्रीकाशी विश्वनाथ मंदिराच्या दोन्ही सुवर्ण शिखरांवर सोने चढवले होते. धाम उद्घाटनापूर्वी दोन्ही सुवर्ण शिखरांची स्वच्छता करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच १३ डिसेंबरला वाराणसीला येत आहेत. ते काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन करतील. यादरम्यान त्यांनी भव्य धामचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यासोबतच मंदिराच्या चौक भागात तुम्ही आरामात काही वेळ घालवू शकाल. बाबा धाममध्ये उभारण्यात आलेल्या संग्रहालयात लोकांना काशीचा भूतकाळ आणि विश्वनाथ धामच्या बांधकामामागील कथेचीही ओळख करून घेता येणार आहे.

श्रीकाशी विश्वनाथ मंदिरात महादेवाचे स्थापित शिवलिंग. हे मंदिर पहिल्यांदा कधी बांधले गेले याबाबत इतिहासकारांचे वेगवेगळे दावे आहेत.

श्रीकाशी विश्वनाथ धामच्या समर्पणानंतर काशीतील 8 लाख घरांमध्ये 7500 स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात 3361 प्रसाद वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

ज्या वेळी आणि ज्या पद्धतीने या धामचे उद्घाटन होत आहे, त्यामुळे संपूर्ण जगात राष्ट्राचा मान वाढेल आणि देशवासियांचे कल्याण होईल.

बातम्या आणखी आहेत...