आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • March 31 Elections For 13 Rajya Sabha Seats In 6 States; Veteran Retired |marathi News

दिव्य मराठी नेटवर्क:6 राज्यांतील 13 राज्यसभा जागांसाठी 31 मार्च रोजी निवडणूक; दिग्गज निवृत्त

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक आयोगाने सहा राज्यांच्या १३ राज्यसभा सदस्यत्वासाठी ३१ मार्च रोजी निवडणूक जाहीर केली. या जागा एप्रिलमध्ये रिक्त होतील. यात पंजाबच्या पाच, केरळच्या तीन, आसामच्या दोन आणि हिमाचल प्रदेश, त्रिपुरा व नागालँडची प्रत्येकी एक जागा असेल. यानंतर पुढील तीन महिन्यांत आणखी ५७ खासदार निवृत्त होतील. यासोबत या वर्षी ७० नवे सदस्य राज्यसभेला मिळतील. सुरुवातीस ज्या १३ जागांवर निवडणूक होत आहे. त्यात पंजाबच्या ५ आहेत. येथून राज्यसभेवर कोण जाणार याचा निर्णय १० मार्च रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूक निकालांवर अवलंबून असेल. काँग्रेसचे दिग्गज नेते प्रतापसिंह बाजवा, अकाली दलाचे सुखदेवसिंग ढिंढसा, नरेश गुजराल आणि भाजपचे श्वेत मलिक यांचा समावेश आहे. दुसरीकडे, आसाममधून काँग्रेसचा चेहरा रिपुन बोरा आणि राणी नारा यांना निरोप मिळत आहे. सध्याच्या समीकरणानुसार काँग्रेस तेथून एकच सदस्य निवडून देऊ शकेल. भाजपला एका जागेचा फायदा होईल.

त्रिपुरातून झरना दास यांची जागा रिक्त झाल्यावर भाजप एक उमेदवार जिंकू शकेल. केरळमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांची जागा रिक्त होत आहे. पाच मनोनीत सदस्यांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी, पत्रकार स्वपनदास गुप्ता, रूपा गांगुली, एस. गोपी, मेरी कोम आणि अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव आहेत.

चिदंबरम, तन्खाही निवृत्त होणार
जूनमध्ये राज्यसभेचे २१ आणि जुलैमध्ये ३४ सदस्य निवृत्त होतील. जुलैच्या निवडणुकीवर भाजपचे विशेष लक्ष असेल. कारण यातील ११ सदस्य उत्तर प्रदेशचे आहेत. तेथील विधानसभा निवडणुकांवर या जागांचा निर्णय होईल. काँग्रेसचे पी. चिदंबरम, विवेक तन्खा, अंबिका सोनी आणि कपिल सिब्बल यांचा कार्यकाळही येत्या तीन महिन्यांत संपत आहे.

बातम्या आणखी आहेत...