आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Marcos Stationed In East Ladakh : Only One Out Of 10,000 Commands Become Marques As A Rock; Ability To Fight For 15 Minutes On The Bottom Of The Sea Without Oxygen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूर्व लडाखमध्ये मार्कोस तैनात:10 हजार कमांडाेंमधून केवळ एक घडताे वज्रासम मार्काेस; विना ऑक्सीजन समुद्र तळाशी 15 मिनिटे लढाई करण्याची क्षमता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्कोस कमांडोंनी 26/11 हल्ल्यावेळी दाखवली खरी ताकद
  • अमेरिकी नेव्ही सील व इस्रायली सैनिकांसाेबत प्रशिक्षण

भारतीय नाैदलाने पूर्व लडाखमध्ये पँगाँग तलावाच्या परिसरात सर्वात खतरनाक मार्काेस कमांडाे तैनात केले आहेत. येथे हवाई दलाचे गरुड कमांडाे व निमलष्कराचे विशेष दलही आधीपासूनच तैनात आहे. क्षेत्रीय तणाव निवळावा यासाठी चीनसाेबत भारत चर्चाही करत आहे. परंतु चीनची चालबाजी लक्षात घेऊन ताकद वाढवली जात आहे. मार्काेस जगातील सर्वात खतरनाक कमांडाे मानले जातात. दहा हजार सैनिकांतून केवळ एकाला मार्काेस बनण्याची संधी मिळते. यावरून त्यांच्या क्षमतेचा अंदाज येऊ शकताे. अमेरिकी सैन्यात नेव्ही सील आहे. त्याचप्रमाणे भारताचे मार्काेस आहेत. दहशतवाद्यांपासून समुद्रातील विविध माेहिमांना फत्ते करण्यात सक्षम ठरतात. ते विनाआॅक्सिजनचे समुद्रात ५५ मीटर खाली किमान १५ मिनिटे लढू शकतात. मार्काेसला दाढीवाले सैन्य असेही संबाेधले जाते. चाकूपासून स्नायपर, रायफल चालवण्याचे प्रशिक्षण असते. ८ किमी उंचीवरून उडी मारणे, १० ते १५ सेकंदात पॅराशूट सुरू करू शकतात.

26/11 हल्ल्यावेळी दाखवली खरी ताकद

मार्काेस नावाच्या मरीन कमांडाे फाेर्सची स्थापना १९८७ मध्ये झाली. सागरी शत्रूंना घुसखाेरीपासून राेखणे आणि दहशतवाद्यांचा बीमाेड करण्यासाठी मरीन कमांडाे मार्काेस असतात. ते जगभरातील विशेष दलासाेबत अनेक संयुक्त सराव करतात. २०११ मध्ये पाकिस्तानच्या अबाेटाबादमध्ये लादेनचा खात्मा करणाऱ्या माेहिमेत यूएस नेव्ही सील्स सहभागी हाेती. २६/११ च्या हल्ल्यानंतर मार्काेसने ऑपरेशन ब्लॅक टाॅर्नेडाे राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला हाेता. त्यांचे बहुतांश प्रशिक्षण आयएनएस अभिमन्यू येथे हाेते. सागरी माेहिमांत ते तरबेज असतात.

हातपाय बांधले तरी पाेहू शकतात

मार्काेससाठी विशेष सैनिकांची निवड केली जाते. त्यात बहुतेक २० वर्षीय सैनिक असतात. मार्काेससाठी निवड झाली तरी अडीच ते तीन वर्षांच्या कठाेर प्रशिक्षणाच्या कसाेटीला पार करावे लागते. या कठीण प्रशिक्षणामध्ये डेथ क्राॅल नावाचाही एक भाग असताे. त्यात सैनिकांना मांड्यांपर्यंत असलेल्या चिखलातून वेगाने पळायचे असते. पाठीवर २५ किलाे वजन व शस्त्रे असतात. त्याशिवाय ते हातपाय बांधले तरी पाेहू शकतात.

९० टक्के प्रशिक्षण पूर्ण करत नाहीत

प्राथमिक प्रशिक्षण सहा महिन्यांचे असते. पहिल्या दाेन महिन्यांत याेग्य कमांडाेजची निवड हाेते. त्यानंतर एक महिना कठाेर शारीरिक चाचणी हाेते. त्यानंतर ९ महिने विविध प्रकारची शस्त्रे चालवणे, विशेष युद्धकुशलता, जगभरातील गाेपनीय माहिती गाेळा करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात युद्ध, दहशतवाद्यांशी चकमक, ओलिसांची सुटका इत्यादी. हे प्रशिक्षण ९० टक्के पूर्ण करू शकत नाहीत.

लिट्टेविराेधी माेहीमही मार्काेसमुळे फत्ते

ऑपरेशन पवन श्रीलंका : १९८७ मध्ये लिटेच्या विराेधातील माेहिमेदरम्यान मार्काेसने भारतीय शांती सेनेच्या रूपात श्रीलंकेला मदत केली हाेती. त्यांच्या मदतीने श्रीलंकेच्या सैन्याने जाफना, त्रिनकाेमाली बेटावर ताबा मिळवला हाेता. यादरम्यान मार्काेसने १२ किमी पाेहून टार्गेट उद्ध्वस्त केले हाेते. यादरम्यान जाेरदार गाेळीबार झाला आणि बाॅम्बस्फाेटही झाले हाेते. परंतु मार्काेस माेहिमेत यशस्वी झाले हाेते.

ऑपरेशन कॅक्टस, मालदीव : १९८८ मध्ये मार्काेसने राष्ट्रपती माैमून अब्दुल गय्युम सरकारच्या तख्तपालटाचे षड‌्यंत्र उलथवून टाकले हाेते. दाेन्ही देशांतील करारानुसार ही कारवाई झाली हाेती. त्याशिवाय श्रीलंकेतील अपहरण प्रकरणात प्रवाशांची दाेन दिवसांत सुटका करण्यात आली हाेती. या दरम्यान ४७ अपहरणकर्त्यांना शरण यावे लागले हाेते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser