आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी लखनऊसह देशातील कोणत्याही भागात ईदचा चंद्र दिसून आला नाही. लखनऊच्या मरकझी चांद समितीने आता 3 मे रोजी ईद साजरी करण्यात येणार असल्याचे सांगतिले आहे. सोमवारी 30 वा रोजा आहे. मौलाना खालिद रशीद फरंगी महली आणि मौलाना सैफ अब्बास यांनी रविवारी संध्याकाळी ही घोषणा केली.
रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईद साजरी केली जाते. रोजादार 30 दिवस अल्लाची सेवा आणि उपवास करतात. चंद्र दिसण्यावर ईद अवलंबून असते. ईदचा हा सण 3 दिवस साजरा केला जातो. रमजानचा महिनाभर चालणारा उपवास ईद-उल-फितरने संपतो. जगभरातील मुस्लिमांसाठी हा सर्वात मोठा सण असतो.
रमजानचा पहिला रोजा 2 एप्रिल रोजी ठेवण्यात आला होता.
मौलाना खालिद रशीद फरंगी महली म्हणाले की, आज शव्वालचा चंद्र दिसला नाही. यामुळे सोमवारी 30वा रोजा आहे. यानंतर 3 मे रोजी ईद-उल-फितर असेल. त्याचवेळी, त्यांनी 3 मे रोजी ईदगाह लखनऊ येथे सकाळी 10 वाजता ईदची नमाज होणार असल्याचे सांगितले आहे. मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी सर्व देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पहिला रोजा 2 एप्रिल रोजी ठेवण्यात आला होता.
ईदचे आहे वेगळे महत्त्व
इस्लाममध्ये ईदचे वेगळे महत्त्व आहे. हा दिवस संपूर्ण रमजान महिन्यानंतर येतो. महिनाभर अल्लाहची सेवा केल्यानंतर मुस्लिम बांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार, ईद-उल-फितर हा सण रमजाननंतर 10 व्या शव्वालच्या पहिल्या तारखेला साजरा केला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.