आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marriage From India, Shortage Of Gowns In Europe; Waiting Until September For A Marriage

महामारीत विवाहाचा धडाका:भारतात मॅरेज फ्राॅम हाेम, युराेपात गाऊनचा तुटवडा; अमेरिकेत विवाह प्रमाणपत्रासाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमध्ये पुढील वर्षी हाेतील जास्त विवाह, बहुतांश कार्यालये बुक

हीथर क्विनलॅन व अॅडम मॅकगवर्न अमेरिकेत राहतात. दाेघांचा आॅक्टाेबरमध्ये विवाह हाेता. परंतु काेराेनामुळे हे शक्य दिसत नाही. क्विनलॅन म्हणाल्या, परिस्थिती कधी सामान्य हाेईल, याचा आम्हाला अंदाज नव्हता. त्यामुळे आम्ही झूम अॅपच्या मदतीने आॅनलाइन विवाह करण्याचे ठरवले. मॅकगवर्न यांनी त्यासाठी पारसी पॅनीचे (न्यूजर्सी) महापाैर मायकल साेरियानाे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर न्यूजर्सीच्या गव्हर्नर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी एक आदेश काढला. दूरस्थ हाेणाऱ्या सिव्हिल मॅरेजला वैध मानण्याचे त्यांचे आदेश आहेत. या आदेशानंतर २० मे राेजी दाेघांचा विवाह पार पडला. जगभरात सध्या अशाच प्रकारे विवाह हाेत आहेत. जगभरात विवाहाच्या काळातील वार्षिक उलाढाल सुमारे ३०० अब्ज डाॅलरची आहे. परंतु आता विवाह पॅनडेमिक प्रूफ राहिलेले नाहीत. विवाहाच्या बाजारात कधीही मंदी येत नाही, असे पूर्वी मानले जायचे. जगभरात ८० टक्के वेडिंग गाऊनचा पुरवठा चीनमधून केला जाताे. काेराेनाच्या या काळात सर्वत्र वेडिंग गाऊनचा तुटवडा दिसून येताे. युराेप, अमेरिकेत हा तुटवडा जास्त जाणवला.

गाऊन किंवा त्याचा कपडा बनवणाऱ्या कारखान्यांना चीनमध्ये फेब्रुवारीतच टाळे लावण्यात आले हाेते. लाॅकडाऊनमध्ये विवाहाच्या संख्येबराेबरच पाहुण्यांची संख्याही कमी झाली. अमेरिकेत वेडिंग प्लॅनिंग वेबसाइट द नाॅटच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत विवाहाला सरासरी १४० पाहुणे येत आहेत. ब्रिटनच्या लक्झरी वेडिंग प्लॅनर कॅटरिना आॅटर म्हणाल्या, आमच्या जवळपास सर्व क्लायंट्सने विवाह २०२१ पर्यंत पुढे ढकलले आहेत. पुढील वर्षी माेठ्या संख्येने विवाह हाेतील. आमच्याकडील विवाह स्थळ पुढील वर्षी एप्रिल ते आॅक्टाेबरपर्यंतसाठी बुक झाले आहेत. चीनमध्ये हीच स्थिती आहे. २० मे चीनमध्ये व्हॅलेंटाइनसारखा दिवस असताे. या दिवशी २ लाखांहून जास्त लाेकांनी विवाह प्रमाणपत्रासाठी नाेंदणी केली आहे. 

भारतात घरी विवाह सुरू..

भारतात दरवर्षी सुमारे १.२ काेटी विवाह हाेतात. गुजरातमध्ये ३० हजारांवर विवाह यंदा टाळण्यात आले किंवा रद्द झाले. ५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह आटाेपले जात आहेत. शादी डाॅट काॅमने ‘वेडिंग फ्राॅम हाेम’ सेवा सुरू केली आहे. त्यात कंपनी विवाहासाठी आवश्यक सर्व गाेष्टींची पूर्तता करून देते.  कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह अनुपम मित्तल अलीकडेच अशा एका विवाहात सहभागी झाले हाेते. या समारंभास ३०० लाेकांची आॅनलाइन हजेरी हाेती.

बातम्या आणखी आहेत...