आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Marriage Innovation During The Corona Period, The Conversion Of Trucks Into Wedding Halls

तामिळनाडू:एका फोनवर वधू-वराच्या घरी पोहोचतो मोबाइल मॅरेज हॉल, 25 हजारांत घरातच केला विवाह

शिवानी चतुर्वेदी | चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा लग्नाचा ट्रक कुठेही बोलावला जाऊ शकतो. हकीमच्या या चमूत सहा लोक काम करत आहेत.
  • कोरोना काळात मॅरेज इनोव्हेेशन, ट्रकचे रूपांतर वेडिंग हॉलमध्ये

कोरोना संसर्गामुळे संपूर्ण तामिळनाडूत वेडिंग हॉल बंद आहे. त्यामुळे कल्याणम (विवाह) होऊ शकत नाहीत. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी तिरुपूर जिल्ह्याच्या उडुमलपेटमध्ये राहणारे कला दिग्दर्शक अब्दुल हकीम यांनी मोबाइल वेडिंग हॉलची संकल्पना मांडली. लहान ट्रकवर बनवलेला हा वेडिंग हॉल लग्नास इच्छुक कुटुंबाच्या एका फोनवर निश्चित स्थळी पोहोचतो. एकदा या स्थळी पोहोचल्यानंतर कारागीर २ तासांत ट्रकच्या सजावटीचे काम पूर्ण करतात. मंचावर चढण्या-उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. मल्टी लाइट सिस्टी, कार्पेट आणि साउंड सिस्टिमही या मोबाइल वेडिंग हॉलमध्ये लावली आहे. पाहुण्यांना स्टेजवर चढण्याआधी सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध करून दिला जातो. हकीम सांगतात की, आम्ही एक महिन्याआधी या संकल्पनेवर काम सुरू केले होते. आतापर्यंत दोन विवाह झाले आहेत. पुढील महिन्यापर्यंत ४ बुकिंग आहेत. २०० पेक्षा जास्त लोकांनी चौकशी केली आहे. मोबाइल वेडिंग हॉलसाठी २५ हजार रुपये आकारले जातात. केटरिंगसाठी २ लाख रुपये घेतात, त्यात ५०-५० पाहुण्यांसाठी दोन वेळचे जेवण तयार केले जाते. हकीम सध्या उडुमलपेटच्या आसपास ५० ते १०० किमीच्या परिसरातच सेवा देत आहेत. त्यांची संकल्पना शेजारील आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही पसंत पडत आहे. हकीम सांगतात की, या राज्यांतून लोक आपले ट्रक पाठवत आहेत. आम्ही त्यांचे वेडिंग हॉलप्रमाणे डिझाइन करून पाठवत आहोत.