आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marriage Under 'Muslim Personal Law' Is Not Outside The Ambit Of POCSO, Having Intercourse With A Minor Wife Is An Offence.

केरळ हायकोर्टाचा निर्णय:‘मुस्लिम पर्सनल लॉ’नुसार झालेले लग्न पॉक्सोच्या कक्षेबाहेर नाही, अल्पवयीन पत्नीशी संबंध गुन्हा

तिरुवनंतपुरम16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ हायकोर्टाने आपल्या एका महत्त्वाच्या निकालात म्हटले आहे की, मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत मुस्लिमांत झालेला विवाह पॉक्सो कायद्याच्या कक्षेबाहेर नाही. पतीने जर अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंध ठेवले तर त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांच्या एकसदस्यीय पीठाने शुक्रवारी आरोपीची जामीन याचिका फेटाळत म्हटले की, पर्सनल लॉमध्ये विवाह वैध असूनही जर एक पक्ष अल्पवयीन असला तर तो पॉक्सोअंतर्गत गुन्हा मानला जाईल. न्यायमूर्ती थाॅमस म्हणाले की, ‘मी पंजाब-हरियाणा हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्टाच्या मतांशी सहमत नाही.’ या दोन्ही हायकोर्टांनी वेगवेगळ्या निकालांत १५ वर्षे पूर्ण झालेल्या एका मुस्लिम मुलीला तिच्या पसंतीने लग्न करण्याचा अधिकार दिला होता आणि पतीला अल्पवयीन मुस्लिम मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यापासून सूट दिली होती. न्यायमूर्ती थॉमस यांनी म्हटले की, मी कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाशीही सहमत होऊ शकत नाही, त्यात कोर्टाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी पर्सनल लॉ अंतर्गत लग्न करणाऱ्या आरोपीविरोधात दाखल केलेला खटला खारिज केला होता. थॉमस यांनी म्हटले की, एका मुस्लिम अल्पवयीन मुलीशी केलेले लग्न पॉक्सो अधिनियमांतर्गत गुन्हा नसेल या कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाशी मी असहमत आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला अत्याचार : केरळच्या खालिदुर रहमानवर असा आरोप आहे की, त्याने पश्चिम बंगालमधून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने या मुलीशी मुस्लिम कायद्यानुसार विवाह केला. आरोपीने जामिनासाठी याचिका दाखल करत म्हटले होते की, आपण कायदेशीरपणे मुलीशी विवाह केला होता आणि मुस्लिम पर्सनल लॉ तरुण झालेल्या समुदायातील मुलींशी लग्न करण्यास परवानगी देतो. आपल्यावर पॉक्सोअंतर्गत खटला चालवता येऊ शकत नाही. त्याने पंजाब-हरियाणा, दिल्ली आणि कर्नाटक हायकोर्टाच्या निकालांचाही हवाला दिला.

बालविवाह म्हणजे मुलीच्या विकासाशी तडजोड करणे कोर्टाने म्हटले की, मुलांशी दुर्वर्तनाचा कायदा कमजोर, भोळ्याभाबड्या आणि निरपराध मुलांचे संरक्षण करण्याच्या गरजेमुळे तयार केला आहे. पॉक्सो कायद्याचा हेतू मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्यास रोखणे हा आहे. मग ते लग्नाच्या आडून ठेवले तरीही. पॉक्सो कायद्याने कलम २ (डी) मध्ये ‘मूल’ या शब्दाची व्याख्या ‘१८ वर्षांखालील कुठलीही व्यक्ती’ अशी केली आहे. बालविवाह म्हणजे मुलीच्या विकासाशी तडजोड करणे आहे. हा समाजाचा अभिशाप आहे.

बातम्या आणखी आहेत...