आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोकरी देण्याच्या बहाण्याने एका विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जयपुरमध्ये उघडकीस आली आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने तीन जणांनी सदरील पीडित महिलेला जयपुरहून इंदुरला नेले. त्यानंतर एका जंगलात जाऊन या तिन्ही नराधमांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.
बलात्कार केल्यानंतर त्यांनी सदरील पीडित महिलेची गळा दाबून हत्या देखील करण्याचा प्रयत्न केला. नराधमांनी पीडितेचा गळा दाबला त्यावेळी त्यांना असा भास झाला की, ती मेली. त्यानंतर नराधमांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र ती पीडित महिला जिवंत होती. घटनेच्या दोन महिन्यांनंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला असून, विवाहित महिलेने 12 जानेवारीला जयपुरमध्ये त्या नराधमांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
नोकरी लावण्याचे आमिष
विवाहित महिलेला नोकरीचे आमिष दाखवत तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आले. त्यात एका पिता-पुत्राचा समावेश आहे. घटनेनंतर दोघेही फरार असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानोता येथील जयपुर आग्रा रोडवर राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेला या नराधमांनी नोकरीचे आमिष दिले होते.
सदरील पीडित महिला ही आपल्या पतीसोबत मोलमजुरी करायची. मात्र नोव्हेबर 2021 मध्ये अति पैशांची गरज भासल्यानंतर तसेच काम मिळत नसल्याने सदरील पीडित महिला आर्थिक विवंचनेत सापडले होते. त्यानंतर ठेकेदारी करणाऱ्या गिरिराज, गंगाधर आणि गिरधारी या नराधमांनी तिला नोकरीचे आमिष दिले. त्यानंतर सदरील पीडित महिलेला घेऊन ते मध्यप्रदेशच्या इंदुरला निघून गेले.
कोल्ड ड्रिंकमध्ये दारु टाकून पीडितेला पाजली
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही नराधमांनी तिला मध्यप्रदेशच्या बगराना येथे नेले होते. त्याठिकाणी इंदुर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जंगलात नेऊन, त्यांनी मला कोल्ड ड्रिंकमध्ये दारू टाकून पाजली. त्यानंतर या तिघांनी सदरील महिलेवर बलात्कार केला.
शुद्धीवर आल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्यांची मदत घेतली
पीडितेवर तिघांनी सामुहिक बलात्कार केल्यानंतरही ती डगमगली नाही. बलात्कारानंतर नराधमांनी तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. गळा दाबल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर नराधमांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. शुद्धीवर आल्यानंतर सदरील पीडित महिलेने रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांची मदत घेतली. त्यानंतर पीडितेने घडलेला संपुर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर या तिन्ही नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.