आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mass Atrocities Against Women In The Eyes Of Husbands And Children; Incidents In Dholpur District Of Rajasthan

धक्कादायक!:पती आणि मुलांच्या डोळ्यांदेखत महिलेवर सामूहिक अत्याचार; राजस्थानच्या ढोलपुर जिल्ह्यातील घटना

राजस्थान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजच्या घडामोंडींमध्ये महिला अत्याचाराच्या बातम्या सहज वाचल्या जातात. तसेच महिला अत्याचाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता पुन्हा एका महिलेला अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. विवाहित महिलेवर तिच्याच नवरा व मुलांसमोर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या ढोलपुर जिल्ह्यात घडली आहे. अत्याचार झालेल्या पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. सहा जणांविरोधात या महिलेने तक्रार केली आहे.

महिलेने पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, आपल्या दलित पतीलाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी अत्याचार, शारिरीक छळ तसेच एस.सी. एस.टीशी संबंधित कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिस उपअधीक्षक विजय कुमार सिंह यांनी दिली आहे. पीडित महिला पती व आपल्या दोन मुलांसोबत शेतातून परतत असताना ही घटना घडली. शेतातून येत असताना सहा जणांनी त्यांना अडवले आणि बंदुकीचा धाक दाखवत धमकावले. आरोपींनी महिलेच्या पतीला मारहाण केली आणि यानंतर सहापैकी दोघांनी मुलांसमोर महिलेवर अत्याचार केला.

महिला आयोगाने घेतली दखल

राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. तसेच पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.
भाजपची प्रतिक्रिया

राज्य सरकारवर टीका करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, या घटनेमुळे पुन्हा एकदा राजस्थानची मान खाली गेली आहे. अशोक गहलोत यांच्या राज्यात तालिबानी पद्धतीने कारभार सुरु असल्याचे दिसत आहे. असे पुनिया म्हणाले आहे.

बातम्या आणखी आहेत...