आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mass Atrocities Committed On Young Woman Under The Pretext Of Giving Lift, Victim's Condition Serious; Hospital Treatment Started

धक्कादायक:लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर केला सामूहिक अत्याचार, पीडितेची प्रकृती गंभीर; रुग्णालयात उपचार सुरु

बिहार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला अत्याचाराच्या रोज नवीन केसेस समोर येत आहे. महिलांना दरवेळेस अत्याचाराला सामोर जावे लागते. त्याप्रमाणे मार्च महिन्यात महिला अत्याचाराच्या सर्वाधिक केसेस समोर आल्या आहेत. यातच आता बिहार मधल्या एका तरूणीला या घाणेरड्या कृत्याला सामोरे जावे लागले आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक अत्याचार करुन रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

दरम्यान मुलीला गंभीर अवस्थेत पाहून तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. तसेच तरूणीला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मुलीवर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद करत आरोपींचा शोध सुरु केला आहे.

पीडितेची प्रकृती गंभीर
पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेडिकलमध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. याबाबत पीडितेकडे चौकशी केली असता दोन आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना त्यावेळी सांगितले. सध्या पाडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडिता आपल्या मित्राला भेटण्यासाठी आपल्या घरुन सकड्डी येथे आली होती. यावेळी बाईकवरुन आलेल्या दोघांनी तरुणीला लिफ्ट दिली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला आणि रस्त्याच्या कडेला टाकून पळून गेले. पीडित तरुणी चारपोखरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिस पुढील प्रकरणाचा तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...