आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापतियाळा येथे खलिस्तानविरोधी मोर्चानंतर झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पंजाब पोलिसांची विशेष 20 पथके राज्यभर छापे टाकत आहेत.गेल्या 24 तासांत पोलिसांनी हिंसाचाराचा सूत्रधार बबरजिंदर परवाना याच्यासह आणखी 6 आरोपींना अटक केली आहे. पतियाळा येथील आयजी मुखविंदर सिंग छिना यांनी सांगितले की, यामध्ये 3 शीख कट्टरतावादी, शिवसेना नेते हरीश सिंगला यांचा साथीदार शंकर भारद्वाज यांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर द्वेषपूर्ण भाषण दिल्याप्रकरणी गग्गी पंडितवरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणात हरीश सिंगला आणि दोन शीख कट्टरपंथींसह ३ जणांना यापूर्वीच पकडण्यात आले आहे. अटक केलेल्यांची संख्या आता 9 झाली आहे.
राज्यभरात ठिकठकाणी रेड
IG छिना म्हणाले की, एसएसपी दीपक पारीख यांच्या नेतृत्वाखाली पतियाळा पोलिसांचे 20 विशेष पथके तयार करण्यात आले आहेत, जे संपूर्ण पंजाबमध्ये छापे टाकत आहेत. परवानाला मोहाली येथून पकडण्यात आले. यानंतर त्याला पतियाळा येथे नेऊन अटक करण्यात आली. आता कोर्टात हजर करून पोलिस कोठडी घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
कॉल डिटेल्स, टॉवर लोकेशन, व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेजने तपास
पतियाळा हिंसाचारावर मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नाराजीनंतर पंजाब पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला आहे. आरोपींचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. मोबाईल टॉवरचे ठिकाण तपासले जात आहेत. याशिवाय हिंसाचाराचे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आयजी छिना म्हणाले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट, चिथावणीखोर वक्तव्ये, परवानगीशिवाय निदर्शने अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
कटाचीही चौकशी केली जाईल : आयजी
या प्रकरणामागे सुनियोजित कट असून यात कोणाचा हात आहे, याचाही तपास केला जाईल, असे आयजी मुखविंदर छिना यांनी सांगितले. सध्या तपासावर परिणाम झालेला नाही, त्यामुळे याबाबत काहीही सांगितले जाणार नाही. सिख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या भूमिकेवर ते म्हणाले की, संपूर्ण तपासानंतर पोलिस सर्व तथ्य सांगतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.