आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभियांत्रिकी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर जेईई किंवा राज्यांत होणाऱ्या सीईटीसारख्या परीक्षांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सची अट कायम राहील. एआयसीटीईचे चेअरमन प्रो. अनिल दत्तात्रय सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले की, नियमांत बदल करून ज्यांनी हे विषय १२वीत अभ्यासलेले नाहीत त्यांच्या प्रवेशासाठी प्रवेशाची विंडो सुरू केली आहे. हे विषय अभ्यासलेले नसतील तर एखाद्याला अभियांत्रिकी प्रवेश देण्याचा निर्णय विद्यापीठे, तंत्रज्ञान संस्था आणि राज्य सरकारवर अवलंबून असेल. अर्थात, अशा विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात तिन्ही विषयांचा मूळ अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेलच.
प्रो. सहस्रबुद्धे यांनी तर्क मांडला की, १०वीनंतर पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीत तीन वर्षीय डिप्लोमा पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना बीई-बिटेकमध्ये थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जातो. एक दशकापूर्वी इंजिनिअरिंगमध्ये केमिस्ट्री ऐच्छिक होता. यानुसार कुणी फिजिक्स, मॅथ्ससोबत इंजिनिअरिंग ड्रॉइंग, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग, स्टॅटिस्टिक्स किंवा व्होकेशनल विषय घेतला असेल तर त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळू शकतो. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा केमिस्ट्रीशी संबंध नाही. बायोटेक्नॉलॉजी किंवा बायो इन्फॉर्मेटिक्समध्ये बायोलॉजी असेल तर अधिक फायदा होताे. सीबीएसई व इतर शाळांत १२वीसाठी अॅग्रिकल्चरल केमिस्ट्री विषय आहे, तर अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी केमिस्ट्री अनिवार्य आहे. प्रो. सहस्रबुद्धे म्हणाले, नव्या शिक्षण धोरणानुसारच नियमांत ही लवचिकता देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.