आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिरमध्ये नमाज पठणावरुन वाद:मथुरेतील नंदबाबा मंदिरात 2 मुस्लिम तरुणांकडून नमाज पठण, 4 जणांवर गुन्हा दाखल

मथुराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरेतील नंदगावादील प्रसिद्ध नंदबाबा मंदिरात दोन मुस्लिम तरुणांकडून नमाज पठण केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मंदिर प्रशासनाकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नमाज पठणानंतर मंदिर प्रशासनाने मंदिराची गंगाजलने शुद्ध करुन घेतली.

घटना 29 ऑक्टोबरची असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे मंदिरात गर्दी कमी होती. प्रथामिक चौकशीत समोर आले आहे की, मंदिरात नमाज पठण करणारे दिल्लीच्या खुदाई खिदमतगार संस्थेचे लोक आहेत. यादरम्यान मंत्री श्रीकांत शर्मा म्हणाले की, यातील दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, चार जण मंदिरात आले होते. यांनी आपले नाव फैजल खान, मोहम्मद चांद, नीलेश गुप्ता आणि आलोक सांगितले. या चौघांनीही स्वतःला हिंदू-मुस्लिम धर्मात विश्वास ठेवणारे सांगितले. तसेच, मोबाइलमध्ये अनेक संत-महंतांसोबतचे अनेक फोटो दाखवले. या चौघांनी मंदिरातील सेवादार कान्हा गोस्वामीकडे दर्शनाची परवानगी मागितली आणि मंदिरात प्रवेश केला. मंदिरात आल्यानंतर फैजल आणि मोहम्मद चांदने नमाज पठण सुरू केले आणि त्यांचे मित्र नीलेश गुप्ता आणि आलोकने फोटो काढले. हेच फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल

मंदिरात नमाज पठण केल्यामुळे साधु संतांमध्ये नाराजी पसरली आहे. सेवादार कान्हा गोस्वामींनी बरसाना पोलिस स्टेशनमध्ये धार्मिक भावनांना ठेस पोहचवल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी फैजल, चांद, नीलेश आणि आलोकवर कलम 153ए , 295 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल केला.