आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मथुरा जन्मभूमी वाद:जिल्हा न्यायालयात श्रीकृष्ण विराजमानकडून खटला दाखल; याचिकेत म्हटले- 'जिथे मशीद, तिथेच भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान'

मथुरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाने दोन तास वकिलांचे युक्तिवाद ऐकले, या प्रकरणी पुढील सुनावणी 16 ऑक्टोबरला होणार आहे

उत्तर प्रदेशातील मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमीचे प्रकरण परत एकदा न्यायालयात पोहचले आहे. सोमवारी श्रीकृष्ण विराजमानकडून जिल्हा न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे, यात 13.37 एकर जमिनीवर दावा करत मालकी हक्काची मागणी केली आहे. यासोबतच शाही ईदगाह मशिदीला हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

न्यायालयात वकील हरिशंकर जैन आणि विष्णु जैन यांनी दोन तास युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 16 ऑक्टोबरची तारीख दिली आहे.

वकील हरिशंकर जैनने सांगितले की, न्यायालयाने प्रकरणाची संपूर्ण प्रकारे शहानिशा केली आहे. 16 ऑक्टोबरला प्रकरणाची पुढील सुनावणी होईल. 1968 मध्ये झालेला करार एक फ्रॉड होता. श्रीकृष्ण जन्मभूमीचा एक मोठा भाग मशिदीला दिला होता. यापूर्वी 25 सप्टेंबरला सिविल जज सीनियर डिवीजनच्या कोर्टातून याचिका दाखल केली होती. त्यावर 30 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीनंतर सिविल कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती.

श्रीकृष्ण विराजमानकडून सांगण्यात आले- जिथे आता मशीद आहे, तिथेच जन्मस्थान आहे

श्रीकृष्ण विराजमानकडून अॅडवोकेट रंजना अग्निहोत्री यांनी सांगितले की, त्यांनी जिल्हा न्यायालयात आपली याचिका दाखल केली. त्यात म्हटले आहे की, ज्या ठिकाणी शाही ईदगाह मशीद आहे, त्या ठिकाणी कारागृह होते, ज्यात भगवान कृष्णाचा जन्म झाला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser