आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mathura Sri Krishna Janmabhoomi : Petition To Remove Eidgah Rejected, Decision Of Mathura Senior Civil Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृष्ण जन्मभूमी वाद:ईदगाह हटवण्याची याचिका फेटाळली, मथुरेच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचा निर्णय

मथुरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13.37 एकर जमिनीची मालकी देण्याची याचिकेत केली होती मागणी

उत्तर प्रदेशातील मथुरेच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमीतील शाही ईदगाह मशीद हटवण्याची याचिका सुनावणीस घेण्यास नकार दिला आहे. याचिकाकर्ता विष्णू जैन, हरिशंकर जैन आणि रंजन अग्निहोत्री यांनी जिल्हा न्यायाधीश छाया शर्मा यांच्या न्यायालयात आपली बाजू मांडली.

२६ सप्टेंबर रोजी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळी असलेल्या १३.३७ एकर जमिनीची मालकी आपल्याला द्यावी आणि तेथील ईदगाह हटवण्याची मागणी करणारी याचिका या न्यायालयात दाखल केली होती.

याचिकेत जमिनीसंदर्भात वाद दाखल करण्यात आला होता. याचिकेत जमिनीवरून १९६८ मध्ये झालेली तडजोड अयोग्य असल्याचे म्हटले होते. तथापि, या याचिकेत श्रीकृष्ण जन्मस्थळ संस्थान ट्रस्टचे म्हणणे होते की, या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नाही. याचिकेत म्हटले हाेते की, मुस्लिमांच्या मदतीने शाही ईदगाह ट्रस्टने कृष्ण जन्मभूमीवर कब्जा केला आहे. तेथे एक ढाचा उभारला आहे. ही याचिका न्यायालयाने फेटाळली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser