आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळीच्या निमित्ताने भारत मॅट्रिमोनी ही लोकप्रिय मॅट्रिमोनियल वेबसाइट वादात सापडली आहे. या संकेतस्थळाने एक जाहिरात सादर केली होती. त्यात महिलांना होळीच्या निमित्ताने त्रास दिला जात असल्यामुळे त्यांनी होळी खेळणे थांबवल्याचा दावा करण्यात आला होता. या अॅडच्या माध्यमातून यंदाच्या होळीला तुम्ही महिला दिवस साजरा करा व स्वतःला सुरक्षित ठेवा असा संदेश देण्यात आला.
भारत मॅट्रिमोनीच्या या जाहिरातीनंतर नेटीझन्सनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. अनेक यूजर्सनी सोशल मीडियावर बॉयकॉट भारत मॅट्रिमोनी ट्रेंड चालवत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ हिंदूफोबिक व लज्जास्पद असल्याचा आरोप केला. पण भारत मॅट्रिमोनीने यावर अद्याप आपली बाजू मांडली नाही.
काय आहे जाहिरातीत?
मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाहिरातीत एका महिलेचा चेहरा वेगवेगळ्या रंगांनी रंगवण्यात आला आहे. ती वॉशरूममध्ये पाण्याने चेहरा धुते. त्यानंतर तिच्या डोळ्यांखाली, नाकाखाली व डोक्याखाली काळे डाग दिसतात. तेव्हाच एक संदेश येतो - काही खुणा अशा असतात की, त्या कधीच धुतल्या नाहीत. सहजासहजी लपवता येत नाहीत.
मेसेजमध्ये पुढे लिहिले आहे - होळीच्या दिवशी महिलांवर जे बेतते ते एखाद्या आघातापेक्षा कमी नाही. यामुळे एक तृतीयांश महिलांनी होळी खेळणे बंद केले आहे. पण यंदाच्या होळीला महिला दिन साजरा करा व त्यांना दररोज सुरक्षित वाटू द्या.
सोशल मीडियावर बॉयकॉट भारत मॅट्रिमोनीचा ट्रेंड
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सनी आपला राग वेबसाइटवर काढला. तसेच ट्विटरवर भारत मॅट्रिमोनी बॉयकॉटचा ट्रेंड सुरू केला. एक यूजर म्हणाला - तुमचा सामाजिक जनजागृतीच्या अजेंड्यासाठी तुम्ही होळीसारख्या हिंदू सणाचा वापर केला. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. दुसरा एक यूजर म्हणाला - हिंदूफोबिक व्हिडिओसाठी मी यावर बहिष्कार टाकेन. अन्य एक यूजर म्हणाला - ही जाहिरात लवकरात लवकर काढून टाका... यामुळे तुमची साइट बंद होईल.
स्विगीही ट्रोल
दोन दिवसांपूर्वी होळीच्या निमित्ताने अंड्याची जाहिरात केल्याप्रकरणी ऑनलाइन फूड अॅप स्विगीलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. जाहिरातीत स्विगीने म्हटले होते - ऑमलेट - सनी साइड - अप -एखाद्याच्या डोक्यावर. # वाईट खेळू नका. इंस्टामार्टहून होळीसाठी आवश्यक सामान मिळवा. या जाहिरातीनंतर सोशल मीडियावर या कंपनीवरही हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला. पण त्यानंतरही वाद थांबला नसल्यामुळे स्विगीने ही जाहिरात काढून टाकली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.