आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'May Navratri Bring Strength, Good Health And Prosperity In Everyone's Life', Prime Minister Modi Wishes Navratri

नवरात्रोत्सव:'नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो', पंतप्रधान मोदींनी दिल्या नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मोदींनी देवीची आरती करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आज 7 ऑक्टोबर 2021 घटस्थापनेपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सव 9 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'नवरात्र सर्वांच्या जीवनात शक्ती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो' अशी प्रार्थना नरेंद्र मोदींनी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांनी सर्व देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी देवीची आरती करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये देशवासियांना शुभेच्छा देत त्यांनी लिहिले की, 'सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. येणारे दिवस जगत जननी मातेच्या पूजेसाठी स्वतःला समर्पित करणार आहोत. नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो' अशी प्रार्थना पंतप्रधानांनी देवीच्या चरणी केली आहे.

पंतप्रधानांनी अजून एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनीदेवी शैलपुत्रीच्या प्रार्थनेचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...