आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Mayawati Handed Over The Leadership Of Bahujans To Brahmins, Dalits Only Voters For Them; We Have Come Out To Strengthen Political Roots, Aim Is To Remove BJP: Chandrashekhar

भास्कर इंटरव्ह्यू:भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांचा बसपा सुप्रीमोवर मोठा आरोप, म्हणाले - मायावतींनी बहुजनांचे नेतृत्व ब्राह्मणांच्या स्वाधीन केले, दलित त्यांच्यासाठी फक्त मतदार आहेत

सहारनपुरएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • रियाज हाश्मी यांनी चंद्रशेखर यांच्याशी केलेली ही खास बातचीत...

भीम आर्मी या पक्षाने उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकांच्या निकालांवर परिणाम करून अनेक मोठ्या प्रस्थापित राजकीय पक्षांची समीकरणे बिघडवली आहेत. चार महिन्यांपूर्वीच प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने भविष्यावर परिणामकारक ठरू शकणाऱ्या शंभर व्यक्तींच्या यादीत भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्या नावाचा समावेश केला आहे.

रियाज हाश्मी यांनी चंद्रशेखर यांच्याशी केलेली ही खास बातचीत...

 • यूपीच्या निवडणुकांवर शेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होईल का?

उद्योगपतींना शेतकर्‍यांची जमीन व पिकांचा ताबा मिळावा यासाठी केंद्राने हा कट रचला आहे, त्यामुळे हे आंदोलन नाइलाजाने करावे लागले आहे. आम्ही सुरुवातीपासूनच या आंदोलनासोबत आहोत. शेतकरी आंदोलनाची ताकद अशी आहे की, भाजपचे नेते खेड्यात प्रवेश करू शकले नाहीत. पश्चिम यूपीमधील 2019 च्या लोकसभा आणि 2017 च्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या. आता सत्तेचा गैरवापर करून राज्यात त्यांचे जिल्हा पंचायत अध्यक्ष बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण वास्तव हेच आहे की, पंचायत निवडणुकीत त्यांना गावातच जाता आलेले नाही.

 • भीम आर्मीच्या माध्यमातून सक्रिय असताना तुम्हाला पक्ष का तयार करावा लागला?

सामान्य माणसाची लढाई लढण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरला आहे. आमचा विश्वास आहे की, ज्यांच्याकडे पक्ष नसतो, त्यांच्या अडचणी सुटत नाहीत. आज सत्ता एक हुकूमशहा आहे, जो आपले मत मांडतो त्याच्याविरोधात खटला दाखल केला जातो. अशा परिस्थितीत आपण आपला लढा दुसर्‍या कोणावर सोपवू शकत नाही. भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही सामाजिक बदल घडवून आणला आणि आता राजकीय मुळे मजबूत करण्यासाठी आम्ही पुढे जात आहोत.

 • आधीपासून प्रस्थापित आणि मजबूत पक्षांशी आपण स्पर्धा करण्यास किती सक्षम आहात?

एखाद्या पक्षाची उंची तेथील मतदारांवर ठरविली जाते. आमच्याकडे निश्चितच संसाधन नाहीत, पण आमच्यात हिंमत खूप आहे. आम्ही दुचाकी आणि सायकलवरून गावागावात जाऊन लोकांना जागे करत आहोत. आम्ही तर काँग्रेसच्या उमेदवारांची रक्कम जप्त होतानाचा काळ पाहिला आहे. भाजप आणि जनसंघाकडे प्रत्येकी दोन-दोन जागा असायच्या आणि आज पूर्ण बहुमत सरकारे आहेत.

 • पंचायत निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी होती?

उत्तर प्रदेशात असा कोणताही जिल्हा नाही जिथे आमचा विजय झाला नाही. जिथे आम्हाला विजय मिळवता आला नाही तिथे आम्ही दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे.

 • मायावतींनी तुमच्यावर बर्‍याच वेळा टिका केली आहे, पण तुम्ही मौन बाळगले, असे का?

माझा प्रश्न असा आहे की, मायावती ज्यांना मतं मागतात, ज्यांना आपले मानतात, त्यांच्यावरच अत्याचार होत असताना त्या गप्प का बसतात, आंदोलन का करत नाही? त्या म्हणाल्या होत्या की, मतं आमची, पण राज्य तुमचे नसेल. याउलट लोकसभेत रितेश पांडे आणि राज्यसभेत सतीश मिश्रा बसपाचे नेते आहेत. यात दलितांचे नेतृत्व कुठे आहे?

 • जर सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र आले आणि बसपाही सामील झाला तर ते मान्य होईल का?

त्यांचे स्वागत आहे. माझा त्याच्याशी वैचारिक लढा आहे, वैयक्तिक नाही. सध्या बसपाच्या लोकांशीही चर्चा सुरू आहे. आशा आहे की त्यांच्याशी युती होईल. पहिले ध्येय म्हणजे भाजपाला हटवायचे आहे. कोरोना काळात भाजपने जनतेची चेष्टा केली. या सरकारने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी लपवली. आम्ही वास्तविक डेटावर काम करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...