आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MBBS Doctors Who Will Become Experts By Doing 2 Years PG Diploma In The District Hospital

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अधिसूचना:जिल्हा रुग्णालयात 2 वर्षे पीजी डिप्लोमा करून तज्ज्ञ बनतील एमबीबीएस डॉक्टर, तज्ज्ञांच्या टंचाईवर केंद्राचा निर्णय; नीट, पीजीच्या निकालाआधारेच पीजीत प्रवेश

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून डॉक्टरांना पीजी डिप्लोमाचे प्रमाणपत्र प्राप्त करता येईल. पीजी डिप्लोमाधारकही तज्ज्ञ डॉक्टर समजले जातील. एवढेच नव्हे तर आणखी दोन वर्षांचे प्रशिक्षण घेऊन पदवीही घेता येईल. जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदा अशी व्यवस्था केली आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत अधिसूचना काढली आहे. सध्या २ ते ३ हजार जागांवर यासाठी प्रवेश घेता येईल. राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे (एनबीई) कार्यकारी संचालक डॉ. पवनइंद्र लाल म्हणाले, पीजी डिप्लोमा जिल्हा रुग्णालयात करता येईल. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची गरज नसेल. नीट पीजीच्या निकालाआधारेच जिल्हा रुग्णालयात काम करणारे एमबीबीएस डॉक्टर डिप्लोमा करू शकतील. दोन वर्षांचे प्रशिक्षण घेऊन तज्ञ डॉक्टर होतील. त्यानंतर २ वर्षांचे अतिरिक्त प्रशिक्षण घेऊन टीचिंग केडरही मिळू शकेल. म्हणजे ते वैद्यकीय महाविद्यालयात शिकवण्यासही पात्र ठरतील.

आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पीजी डिप्लोमामुळे जिल्हा रुग्णालय व रुग्णांना फायदा होईल. रुग्णालयात कार्यरत एमबीबीएस डॉक्टर स्पेशालिस्ट होतील. देशात ८५ हजार एमबीबीएसच्या जागा आहेत. पीजीसाठी ४५ हजार जणांनाच संधी मिळते. ज्यांना वैद्यकीय महाविद्यालयात पीजीसाठी प्रवेश मिळत नाही ते पीजी डिप्लाेमा करून तज्ञ होऊ शकतील.

पुढील वर्षापासून ८ स्पेशालिटीत पीजी डिप्लोमा
येत्या वर्षापासून आठ विषयांत पीजी डिप्लोमासाठी प्रवेश सुरू होईल. नीट पीजीच्या निकालाच्या आधारावर प्रवेश मिळेल. यात अॅनेस्थेसिया, स्त्री व प्रसूती रोग, पीडियाट्रिक, ईएनटी, ऑप्थोलमॉलॉजी, फॅमिली मेडिसिन, ट्यूबरक्लोसिस अँड चेस्ट डिसीज आणि मेडिकल रेडिओडायग्नॉस्टिक यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...