आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MDH चे महाशय यांची कहाणी:एकेकाळी दिल्लीच्या रस्त्यावर चालवायचे टांगा; मसाल्यांच्या व्यवसायातून उभारले 2 हजार कोटींचे साम्राज्य

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाच्या फाळणीनंतर भारतात आले होते गुलाटी कुटुंब, खिशात होते अवघे 1500 रुपये

MDH मसालेचे सर्वेसर्वा महाशय धर्मपाल गुलाटी यांचे गुरुवारी सकाळी 5.30 वाजता हृदयविकाऱ्यांच्या झटक्याने निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. धर्मपाल गुलाटी एकेकारी दिल्लीच्या रस्त्यांवर टांगा चालवत होते आणि नंतर कोट्यवधींचे व्यावसायिक बनले. आम्ही त्यांची गोष्ट सांगत आहोत.

धर्मपाल गुलाटी दिल्लीच्या रस्त्यांवर टांगा चालवत होते. दोन महिन्यांतच त्यांनी हे काम सोडले
धर्मपाल गुलाटी दिल्लीच्या रस्त्यांवर टांगा चालवत होते. दोन महिन्यांतच त्यांनी हे काम सोडले

धर्मपाल यांचे कुटुंब पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये राहत होते. धर्मपाल यांना शिक्षणात रस नव्हता. वडील चुन्नीलाल यांनी खूप प्रयत्न केले. पण धर्मपाल यांचे शिक्षणात मन लागले नाही. 1933 मध्ये पाचवीची परीक्षाही दिली नाही आणि पुस्तकांकडे कायचमी पाठ फिरवली. वडिलांना त्यांना एका कामाला लावले. पण तेथेही त्यांचे मन लागले नाही. एकापाठोएक अनेक कामं सोडली. यामुळे वडील काळजीत होते, त्यानंतर त्यांनी सियालकोटमध्ये मसाल्यांचे दुकान उघडून दिले. मसाल्यांचा व्यापार हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय होता. कालांतराने दुकानाचा व्यवसाय वाढत गेला. याला पंजाबीत महाशियां दी हट्टी (महाशय यांचे दुकान) म्हटले जात असे. म्हणूनच त्यांच्या कंपनीला त्याचे शॉर्ट फॉर्म MDH असे नाव देण्यात आले.

वडील चुन्नीलाल आणि आई चन्नन देवी यांच्यासोबत धर्मपाल गुलाटी (उजवीकडे)
वडील चुन्नीलाल आणि आई चन्नन देवी यांच्यासोबत धर्मपाल गुलाटी (उजवीकडे)

सर्व काही सुरळीत सुरू होते. त्यावेळी देशाची फाळणी झाली. सियालकोट पाकिस्तानात गेले. हे कुटुंब सर्व काही सोडून सप्टेंबर 1947 मध्ये अमृतसर नंतर काही दिवसांनी दिल्लीत आले. तेव्हा धर्मपाल यांचे वय 20 वर्ष होते. फाळणीची वेदना त्यांनी चांगलीच पाहिली आणि अनुभवली होती. कुटुंबाने सर्व काही पाकिस्तानात सोडले आहे आणि भारतात पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल हे त्यांना माहीत होते.

धर्मपाल गुलाटी पत्नी लीलावतीसोबत. त्यांना व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसांत पत्नीचा देखील भरपूर पाठिंबा मिळाला
धर्मपाल गुलाटी पत्नी लीलावतीसोबत. त्यांना व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसांत पत्नीचा देखील भरपूर पाठिंबा मिळाला

खिशात केवळ 1500 रुपये होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी 650 रुपयांत एक टांगा खरेदी केला आणि दिल्लीच्या रस्त्यांवर चालवण्या सुरुवात केली. त्यावेळी एका प्रवाशाचे दोन आणा किराया घेत होते. पण म्हणतात ना ज्याचे काम त्यालाच जमते. महाशयांचे मन तर व्यावसायात रमत होते. यामुळे 2 महिन्यांनी त्यांनी टांगा चालवणे बंद केले. जवळ असलेल्या भांडवलातच घरी मसाले बनवणे आणि विक्री करण्यास सुरुवात केली.

भारत-पाकिस्तान फाळणीनंतर दिल्लीच्या करोलबागेत धर्मपाल गुलाटींनी मसाल्याचे दुकान सुरू केले होते. त्यांचे मसाले शुद्धतेसाठी प्रसिद्ध होते, म्हणून व्यवसाय वेगाने वाढला.
भारत-पाकिस्तान फाळणीनंतर दिल्लीच्या करोलबागेत धर्मपाल गुलाटींनी मसाल्याचे दुकान सुरू केले होते. त्यांचे मसाले शुद्धतेसाठी प्रसिद्ध होते, म्हणून व्यवसाय वेगाने वाढला.

धरमपालने किर्तीनगर, दिल्ली येथे अल्प भांडवलासह पहिला कारखाना सुरू केला. आज MDH देश आणि जगात आपली चव आणि सुगंध पसरवत आहे. MDH चे मसाले लंडन, शारजाह, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, न्यूझिलंड, हाँगकाँग, सिंगापूर यांसह अनेक देशात मिळतात. MDH मसाल्याचे 1000 पेक्षा जास्त डिस्ट्रीब्यूटर आणि चार लाखांपेक्षा जास्त रिटेल डीलर्स आहेत. सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. या कंपनीकडे आधुनिक मशीन्स आहेत. याद्वारे एका दिवसात 30 टन मसाले कुटले आणि पॅक केले जाऊ शकतात.

1950 च्या दशकात अभिनेता राज कपूरसोबत धर्मपाल गुलाटी.
1950 च्या दशकात अभिनेता राज कपूरसोबत धर्मपाल गुलाटी.

महाशयांचे आयुष्य अडचणीत गेले होते, यामुळे ते इतरांच्या वेदना सामायिक करण्यात नेहमीच पुढे असायचे. त्यांनी वडिलांच्या नावाने महाशय चुन्नीलाल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या संस्थेद्वारे अनेक शाळा, रुग्णालये आणि आश्रम उभारले. याद्वारे गरीब आणि गरजूंची मदत केली जाते.

उद्योगातील योगदानाबद्दल महाशय धर्मपाल यांना गेल्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
उद्योगातील योगदानाबद्दल महाशय धर्मपाल यांना गेल्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser