आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Meals Rate In Parliament Canteen Is Tripled; New Menu Released After Closing The Subsidy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:संसदेच्या कँटीनमध्ये जेवण तिप्पट महागले; थाळी 60 ऐवजी 100 रुपयांची, राइस 7 वरून 20 रुपयांत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुदान बंद केल्यानंतर नवा मेन्यू जारी, हॉटेल्सच्या तुलनेत आजही अनेक पदार्थ स्वस्तातच

देशभरात सर्वात स्वस्त जेवणासाठी प्रसिद्ध संसदेच्या उपाहारगृहात आता जेवणे महागात पडेल. अनुदान बंद केल्यानंतर लोकसभा सचिवालयाने नवा मेन्यू व दर जारी केले आहेत. ते २९ जानेवारीला सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लागू होतील. आधी ६० रुपयांत मिळणारी थाळी १०० रुपयांत मिळेल.

नव्या मेन्यूनुसार, कँटीनमध्ये मिळणाऱ्या ५८ पदार्थांत पोळी आजही सर्वात स्वस्त ३ रुपयांना असेल. ती आधी २ रुपयांना होती. सर्वात महागडा पदार्थ नाॅनव्हेज बुफे लंच आहे. तो ७०० रुपयांना आहे. शाकाहारी जेवणात व्हेज बुफे लंचचे दर ५०० रुपये आहे. तो शाकाहारी पदार्थांत सर्वात महाग आहे. तसेच इडली-सांबर १८ वपरून २५ रु., ज्यूस २४ वरून ६०, सूप १४ वरून २५ रुपयांना मिळेल.

१९६८ पासून लोकसभा कँटीनची जबाबदारी नॉर्दर्न रेल्वेकडे हाेती. ती आता आयटीडीसीकडे (इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन) असेल. अधिवेशनादरम्यान रोज सुमारे ४५०० लोक कँटीनमध्ये येतात. २०१९-२० वर्षांत १७ कोटींचे अनुदान मिळाले. पैकी २४ लाख खासदारांवर खर्च झाले. उर्वरित रक्कम पाहुणे, सुरक्षा कर्मचारी व सचिवालय अधिकाऱ्यांच्या जेवणावर खर्च झाले. चहा, कॉफीचे दरांत बदल झालेला नाही.

हॉटेल्सच्या तुलनेत आजही अनेक पदार्थ स्वस्तातच

संसदेच्या उपाहारगृहातील पदार्थ नव्या दरवाढीमुळे महागणार आहेत. तथापि, ते इतर हॉटेल्सच्या तुलनेत स्वस्तच राहणार आहेत. साधा डोसा ३० आणि मसाला डोसा ५० रुपयांत मिळेल. बाजारात तो ५० ते १०० रुपयांत मिळतो. कढाई पनीर व मटर पनीर ६० रुपयांना मिळणार आहे.