आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Measles In 6 States; 3 Doses Of Vaccine To Be Given To 5 year old Children, Center Sends Medical Teams To 3 States

धोका:6 राज्यांत गोवर; 5 वर्षांच्या मुलांना देणार लसीचे 3 डोस, केंद्राने 3 राज्यांत पाठवल्या मेडिकल टीम

पवन कुमार | नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने गोवर संसर्ग असलेल्या भागांतील पाच वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना लसीचे तीन डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत देशात मुलांना गोवरच्या लसीचे दोन डोस दिले जात होते. आता पहिली लसही नऊऐवजी सहा महिन्यांतच दिली जाईल. बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि केरळमधील काही भागांत मुलांमध्ये गोवरचा संसर्ग वेगाने पसरत असतानाच सरकारने हे पाऊल उचलले आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दररोज लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी उच्चस्तरीय मेडिकल टीम झारखंड, गुजरात आणि केरळला रवाना केल्या.

{आतापर्यंत... पहिला डोस ९ ते १२ महिन्यांत, दुसरा डोस १६ ते २४ महिन्यांच्या आत दिला जात होता. {मुंबईत गोवरमुळे आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. यानंतर मृतांची एकूण संख्या १२ झाली. मुंबईत संक्रमित १३ नवे रुग्ण आढळले. {साशंकता... २०२३ पर्यंत संपूर्ण देश गोवरमुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले होते. मात्र, अलीकडच्या काळात गोवरचे रुग्ण आढळल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.

बातम्या आणखी आहेत...