आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्तेची मोजमाप:आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेचे मोजमाप सुरू

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची मोजमाप घ्यायस सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. शनिवारी कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांच्या राहत्या निवासस्थानाची आणि त्यांच्या अन्य मालमत्तेची मोजमापे घेण्यात आली. दरम्यान, या सगळ्या कारवाया कुणाच्या दबावाखाली सुरू आहेत हे जनतेला माहित आहे. या दबावाला घाबरून आपण उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

नाईक यांची रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर या चौकशीमध्ये आता नव्याने एक ट्विस्ट आला आहे. नाईक यांचे कणकवलीतील घर, शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज, क्रशर तसेच हळवल येथील पाईप फॅक्टरी या सर्व ठिकाणच्या बांधकामाची त्यावेळच्या दरानुसार व्हॅल्युएशन करून अहवाल सादर करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यानुसार आता ही कारवाई करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...