आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फूड इनोव्हेशन:शाकाहारी लोकांसाठी बनवले मांस व मासे; चव-पाैष्टिकता मांसाहारासारखीच

नवी दिल्ली / ननू जोगिंदर सिंहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयआयटी दिल्लीची शाकाहारी अंड्यानंतर नवी कमाल

एखाद्याला कुपोषणाची समस्या असते, तर एखाद्याला मांसाहार करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, कुटुंबात मांस, मासे आणि अंडी खात नाहीत. यामुळे लोकांना अडचणी येतात. यामुळेच आता आयआयटी दिल्लीने वनस्पती आधारित मांस आणि मासे तयार केले आहेत. ते शाकाहारी लोकही खाऊ शकतात. विशेष म्हणजे आयआयटी दिल्लीच्या ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्राने जे मांस तयार केले आहे त्याची चव तसेच गंध बिलकुल खऱ्या मांसासारखा आहे. त्याला ‘मॉक मीट’ म्हटले जात आहे. मागील दोन वर्षांपासून आयआयटी दिल्लीच्या प्रा. काव्या दशारा आणि त्यांची टीम पोषक आणि सुरक्षित पौष्टिक उत्पादनावर काम करत आहे. प्रा. काव्या यांना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या वतीने मॉक एगच्या संशोधनासाठी पुरस्कारही मिळाला आहे.

या उत्पादनासाठी संयुक्त राष्ट्राच्या टीमने आयआयटी दिल्लीला भेट देत शाकाहारी अंडे शिजवून पाहिले. प्रा. काव्या सांगतात की, मांसातील प्रोटीन डाळींच्या प्रोटीनपेक्षा चांगले असले तरी ते तयार करण्यासाठी सध्या हार्मोन आदींचा वापर होत आहे, जे सुरक्षित नाही. काही अन्नातील प्रोटीन मांसातील प्रोटीनसारखेच असल्याचे त्यांना संशोधनात आढळून आले.

मासे अस्सल नसल्याचे बंगालीही ओळखू शकले नाहीत
- या वनस्पती आधारित मांस, माशांच्या चाचणीसाठी काव्या यांनी रोजच्या आहाराचा भाग असलेल्या बंगाल व पूर्वांचलच्या लोकांना बोलावले होते.
- ही ब्लाइंड टेस्टिंग होती. त्यांनी ती मासळी असल्याचेच सांगितले. सर्वांनी ती आवडीने खाल्ली व ती मासळी खरी नसल्याचे कोणीच ओळखू शकले नाही. विशेष म्हणजे या माॅक मासळीपासून ओमेग्रा थ्रीची गरजही पूर्ण होईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser