आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Medanta Chairman Dr. Naresh Trehan, Special Discussion Pay Off Debt Through IPO, Hospital In Every State

मेदांता चेअरमन डॉ. नरेश त्रेहन, विशेष चर्चा:आयपीओतून कर्जफेड करू, प्रत्येक राज्यात रुग्णालय

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेदांता हॉस्पिटल्स चालवणाऱ्या ग्लोबल हेल्थचा आयपीओ सुरू झाला आहे. त्यात सोमवार ७ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकेल. ३ नोव्हेंबरला सुरू झालेल्या आयपीओसाठी ४९ टक्के सबस्क्राइब झाले आहे. ग्लोबल हेल्थ या आयपीओद्वारे २२०५.५७ कोटी रुपये उभारणीची योजना आहे. त्यात ५०० कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू व १७०५.५७ कोटी ऑॅफर फॉर सेलद्वारे मिळतील. आयपीओ व कंपनीच्या विकाससंबंधी ग्लोबल हेल्थचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश त्रेहन यांनी दैनिक भास्करशी केलेली ही चर्चा..

{आयपीओचा पैसा कोठे वापराल? फ्रेश इश्यूद्वारे कंपनीकडे ५०० कोटी जमा होतील. या रकमेतून कर्ज कमी करू. सध्या कंपनीवर ग्रॉस डेट ८०० कोटी रुपये व रोख ५०० कोटी आहेत. म्हणजेच आमचे नेट डेट ३०० कोटी रुपये आहे. कर्ज कमी केल्याने बॅलन्सशीट मजबूत होईल. विस्तारही करू.

{नवीन रुग्णालये सुरू करणार आहात? प्रत्येक राज्यात मेदांता हॉस्पीटल सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. ते राज्याच्या मध्यवर्ती शहरात असावे. यातून जास्त लोकसंख्येला चांगले उपचार मिळू शकतील. गुडगावचे हॉस्पीटल संपूर्ण दिल्ली-एनसीआरला सेवा देत आहे. लखनऊ, पाटण्याचे रुग्णालयही सेवा देत आहे.

{सेवेचा दर्जा कायम कसा राखला ? आमच्याकडे चांगल्या डॉक्टरांची फळी आहे. प्रत्येक रुग्णालयात वेगवेगळ्या रुग्णांसाठी वेगवेगळे डाॅक्टरचे गट आहेत. ते निश्चित अशा प्रोटोकॉलमध्ये काम करतात. आमच्याकडे प्रत्येक डॉक्टर पूर्णवेळ आहे. ते केवळ मेदांतासाठी काम करतात. त्यामुळेत एकाग्र होऊन काम करतात. म्हणूनच आम्ही जागतिक दर्जाची सेवा देऊ शकतो.

{कोरोनानंतर पायाभूत बदल केले? आम्ही रुग्ण सुरक्षेवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. संसर्ग पसरणार नाही. असे तंत्रज्ञान आमच्या प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध आहे. देशातील पहिल्या कोविड बाधित १४ इटालियन व्यक्तींना मेदांतामध्ये ठेवण्यात आले होते. कारण सुरक्षेच्या बाबतीत आम्ही इको सिस्टिम विकसित केली आहे. ३० टक्के खाटा क्रिटिकल केअरच्या आहेत.

{भावी गुंतवणूकदारांना काय आवाहन कराल? आमचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले आहे. १२ वर्षांत कंपनीने ५ रुग्णालये सुरू केली. आमच्याकडील खाटांची संख्या २५०० झाली आहे. दोन वर्षांत ती वाढून ३५०० होईल. इतरही विस्तार योजनांबाबत चर्चा सुरू आहे. आयपीओच्या प्रायसिंगलाही परवडण्या योग्य करण्याचा प्रयत्न आहे.

मेदांताचे ५ रुग्णालये {डॉ. नरेश त्रेहन यांनी २००९ मध्ये गुरुग्राममध्ये पहिले रुग्णालय सुरू केले. {आता गुरुग्राम, इंदूर, रांची, लखनऊ, पाटण्यात रुग्णालय. {उत्तर प्रदेशच्या नोएडात आणखी एक रुग्णालय सुरू होईल. {३० जून २०२२ पर्यंत एकूण खाटा २,४६७ व डॉक्टर १३०० हून जास्त.

बातम्या आणखी आहेत...